सिरसाळा - सोनपेठ रस्त्यावर बोअरवेलचा ट्रॅक्टर पलटी :चालक जागीच ठार तर सहकारी गंभीर जखमी



परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

       सिरसाळा - सोनपेठ रस्त्यावर चालते ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याने चालक जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक २२ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली आहे.  

       एमएच २२ एएम १४६८ असे त्या बोअरींग ट्रॅक्टर चा क्रमांक आहे.  सिरसाळ्या कडून सोनपेठ च्या दिशेने  ट्रॅक्टर जात होते. सुसाट वेगात असलेल्या ट्रॅक्टर चालकाचा अचानक ताबा  सुटला व ट्रॅक्टर जागीच पलटी झाले.  पलटी होताच चालक ट्रॅक्टर खाली सापडला व त्याचा चिराडा होऊन तो जागीच ठार झाला.  त्याचा  सहकारी गंभीर जखमी झाला आहे. दोघेही परराज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी तात्काळ पोलीस प्रशासन दाखल झाले. पोलिस नोंदीची प्रक्रिया सुरु आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!