नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...
केदारनाथाचे दर्शन घेत असतानाच वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०१ कोटीच्या आराखड्यास मंजूरी
मुंबई दि. २२ -- चार धाम यात्रेच्या दरम्यान केदारनाथाचे दर्शन घेत असतानाच परळीच्या श्रीक्षेत्र वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्राचा ३०१ कोटीचा आराखडा मंजूर केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज वर्षा निवासस्थानी जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत राज्यातील इतर देवस्थानाबरोबरच परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र विकासाच्या ३०१ कोटी रूपयांचा आराखडा मंजूर केला. बैठकीच्या दरम्यान ना. पंकजाताई मुंडे चार धाम यात्रेला गेल्या असल्याने उपस्थित राहू शकल्या नव्हत्या पण त्यांनी केदारनाथाला मनोभावे केलेली प्रार्थना फळास आली. मागील सरकारमध्ये मंत्री असताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती. चार धाम यात्रेत केदारनाथाचे दर्शन घेत असताना इकडे त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र आराखड्यास मंजूरी दिली, हा योगायोगच म्हणावा लागेल. या आराखड्यातंर्गत परळीत मंदिर परिसरात मोठया प्रमाणात विकास कामे होणार असून शहराचे रूप पालटणार आहे.
*मुख्यमंत्र्यांचे मानले आभार*
------
ना. पंकजाताई मुंडे यांनी आज वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मंजुरी दिल्याबद्दल केदारनाथाचा प्रसाद आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा