इमेज
धारूर घाटात ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी धारुर: अपघातासाठी कुप्रसिद्ध झालेल्या धारूर घाटात आज गुरुवारी (दि.२१) रात्री आणखी एक अपघात झाला. ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हनुमंत दराडे (रा. गावंदरा, ता. धारूर) असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिलीं.  अपघातातील धडक इतकी भीषण होती की, हनुमंत दराडे यांच्या गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

समीर शेख यांची बीड जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती



 बीड — समीर शेख यांची बीड जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य नियंत्रण कक्षातून त्यांची बीडला बदली करण्यात आली असून त्यांनी सचिन पांडकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पदभार स्वीकारणार आहेत.

पोलीस दलाचा आश्वासक चेहरा म्हणून ओळख असलेल्या सचिन पांडकर यांची जवळपास साडेतीन वर्षानंतर धाराशिव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. सचिन पांडकर यांच्या कार्यकाळात अनेक आव्हानात्मक प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. असे असले तरी प्रत्येक वेळी त्यांनी पोलीस दल व जनता यांचा समन्वय साधून कामकाज केले. बीडच्या इतिहासात इतका कर्तव्यदक्ष अधिकारी लाभला नव्हता. आंदोलन काळात बीडमध्ये झालेली जाळपोळ असो की संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण झाल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती कुशलतेने त्यांनी हाताळली. पोलीस दलातला वरिष्ठ अधिकारी असताना देखील त्यांच्याकडे आपली कैफियत घेऊन येणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करत होते. परिणामी पोलीस दलाची प्रतिमा टिकून राहण्यात त्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे. त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता बीडकरांना लागली होती. दरम्यान राज्य नियंत्रण कक्षेतून समीर शेख यांची अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात बीड मधील कायदा सुव्यवस्थेचे आव्हानांना समीर शेख कसे सामोरे जातात हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या