एक एकर परिसरात बहरली बारा हजार झाडांची हिरवळ....

दीपक देशमुख यांच्या संकल्पनेतून आठ महिन्यांत फुलले ‘ऑक्सिजन पार्क’; भर उन्हाळ्यातही हिरवागार कॅम्पस 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी :

    आजच्या काळात वेगाने होणारी वृक्षतोड, वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान ही गंभीर समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत पर्यावरण संवर्धनासाठी केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करणारे हात फार कमी दिसतात. परळी शहराचे माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ देशमुख यांनी मात्र आपल्या कृतीतून एक प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

     महाविद्यालय परिसरात अवघ्या आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेले ‘ऑक्सिजन पार्क’ आज भर उन्हाळ्यातही हिरवागार आणि टवटवीत दिसत आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून त्यांची योग्य निगा राखल्यामुळे परिसराला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. कडक उन्हाळ्यातही या ठिकाणी गारवा आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला मिळत असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. आज अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होत असताना, दीपक देशमुख यांचा हा उपक्रम पर्यावरण प्रेमींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, हिरवेगार वातावरण आणि निरोगी जीवन मिळावे यासाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.“एक झाड हजारो श्वासांचे जीवन असते” हा संदेश देणारे दीपक देशमुख यांचे ‘ऑक्सिजन पार्क’ सध्या परळी शहरात चर्चेचा विषय बनले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार