नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...

इमेज
  परळी औष्णिक वीज प्रकल्पातील एकाचवेळी १९ अधिकाऱ्यांच्या बदल्या; रिक्त पदांमुळे प्रकल्पाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह परळी वैजनाथ : परळी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील कार्यकारी अभियंत्यासह विविध महत्त्वाच्या पदांवरील तब्बल १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याने प्रकल्प परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी अद्याप एकाही नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने प्रकल्पाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, परळी औष्णिक प्रकल्पाच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.            महानिर्मितीच्या परळी औष्णिक वीज केंद्रात गेल्या काही वर्षांपासून वीज निर्मितीची घट, जुन्या यंत्रणांची अवस्था आणि प्रकल्पाच्या भवितव्याबाबत वेळोवेळी चर्चा होत असतानाच आता मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांनी या चर्चेला अधिकच खतपाणी घातले आहे. कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ, सुरक्षा अ...

विहिरीमध्ये आडवे बोर घेताना दोन मजुरांचा मृत्यू; एक जखमी



माजलगाव - तालुक्यातील खरात आडगाव येथील जय महेश शुगर इंडस्ट्रीजच्या विहिरीचे काम सुरू असताना झालेल्या  अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जय महेश शुगर इंडस्ट्रीजच्या विहिरीमध्ये आडवे बोर घेण्यासाठी बोरिंग मशीन आणण्यात आली होती. बोरिंग मशीनच्या झुल्याचे काम सुरू असताना अचानक झुला तुटून थेट विहिरीमध्ये कोसळला. या दुर्घटनेत जशवंत मीना (वय 26, रा. चित्ताखेडी, मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच आणखी एका मजुराचाही मृत्यू झाला असून त्याची ओळख अद्याप समजू शकलेली नाही.

या अपघातात रविराज सिंग (वय 18, रा. मंदसोर, मध्यप्रदेश) हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, एका मजुराचा मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून दुसऱ्या मजुराचा मृतदेह विहिरीमध्ये अडकला असल्याने शोधकार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या