मोहा येथील घटनेने बीडमध्ये हळहळ
रंगकर्मी प्रदीप भोकरे यांना स्मृतिशेष विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार प्रदान
परळी प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, महानगर शाखा लातूर यांच्या वतीने दिले जाणारे विविध पुरस्कार काल दिमाखदार वातावरणात वितरीत करण्यात आले. रंगभूमी, अभिनय आणि नाट्य चळवळीतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत हा सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात स्मृतिशेष विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कार रंगकर्मी श्री. प्रदीप भोकरे यांना, स्मृतिशेष बंकटराव पुरी पुरस्कार श्री. संकर्षण कऱ्हाडे यांना तर रंगमंचीय कार्यगौरव पुरस्कार सौ. नीलम शिर्के-सामंत यांना प्रसिद्ध अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
परळी सिने-नाट्य कलावंत संघटनेचे अध्यक्ष असलेले रंगकर्मी प्रदीप भोकरे हे सातत्याने रंगभूमीवर सक्रिय असून त्यांनी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा, बाल नाट्य तसेच कामगार कल्याण नाट्य स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि रंगतंत्रज्ञ या विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना स्मृतिशेष विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी ॲड. शैलेश गोजमगुंडे, प्रा. डॉ. दिपक वेदपाठक, रणजीत आचार्य तसेच महानगर शाखेचे इतर पदाधिकारी, सदस्य आणि लातूरमधील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल परळीतील ज्येष्ठ साहित्यिक आबासाहेब वाघमारे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद परळीचे अध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, डॉ. विनोद जगतकर, प्रोफे. चंद्रद्रशेखर कणसे, ज्येष्ठ सिने कलावंत शेख गणी, सिने-नाट्य दिग्दर्शक डॉ. चंद्रकांत जोगदंड, सिने-नाट्य कलावंत संघटनेचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, ज्येष्ठ साहित्यिक संपादक भीमयुगकार रानबा गायकवाड, सिने-नाट्य कलावंत नागेश्वर खंदारे, विठ्ठलराव झिलमेवाड, बा. सो. कांबळे, सिद्धेश्वर इंगोले, रवी आघाव, महेश होनमाने, प्रकाशसिंग तुसाम, गंगाधर क्षीरसागर, मारोती कांबळे, ब्रम्हानंद कांबळे, विकास वाघमारे, नवनाथ दाणे, वैजनाथ कळसकर, श्रीकांत कान्हेगावकर, आसिफ शेख, अनंत सोळंके, सिध्दांत लांडगे, विद्याधर शिरसाट, पूजा कुरुंद, रतन लिंबेकर, विनायक काळे आदींनी पुरस्कार प्राप्त रंगकर्मी प्रदीप भोकरे यांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा