डॉ. श्रीगणेश मुंडे यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव




परळी प्रतिनिधी:

परळी वैजनाथ येथील मूळ रहिवासी तथा महानिर्मिती कंपनीमध्ये कार्यरत असलेले डॉ. श्रीगणेश महादेव मुंडे यांना प्रशासकीय कार्य, मानव संसाधन व्यवस्थापन, सुनियोजन आणि सामाजिक बांधिलकीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गौरविण्यात आले आहे.

आयएफईए संस्थेच्या वतीने उत्कृष्ट प्रशासकीय व मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच ग्लोबल एक्सेललेन्स समिट २०२६ तर्फे त्यांच्या विशेष कार्याबद्दल अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या सर्वांगीण कार्याची दखल घेत अमेरिकन मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने त्यांना मानद पीएच.डी. पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे.

डॉ. श्रीगणेश मुंडे यांनी D. Pharm, B. Pharm, MBA (HR) तसेच YCMOU अंतर्गत PhD Scholar म्हणून शिक्षण घेतले आहे. सध्या महानिर्मिती कंपनीच्या मुख्यालय मुंबई येथे मुख्य लिपिक म्हणून ते कार्यरत असून यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद जालना येथे औषध निर्माण अधिकारी तसेच परळी वैजनाथ थर्मल विद्युत केंद्रात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.

राष्ट्रीय वीज कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित येथे बिनविरोध संचालक म्हणून निवड झाल्यानंतर ते सचिव पदाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडत आहेत. कामगारांचे प्रश्न मार्गी लावणे, कार्यालयीन सहकाऱ्यांशी आत्मीयतेने वागणे, सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेणे आणि गरजूंना मदत करणे या माध्यमातून त्यांनी एक संवेदनशील व लोकाभिमुख अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विद्यार्थीदशेत एनएसएसमधील उल्लेखनीय कार्य, रक्तदान शिबिरातील सक्रिय सहभाग तसेच सेवाकाळात उत्कृष्ट कार्याबद्दल विविध मुख्य अभियंत्यांच्या हस्ते त्यांना अनेक पुरस्कार, प्रशस्तीपत्रे व गौरवपत्रे प्राप्त झाली आहेत. दैनिक सोमेश्वर साथीच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना “समाजरत्न” पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

प्रशासकीय कार्यक्षमता, सामाजिक जाणीव आणि माणुसकीची सांगड घालणारे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. श्रीगणेश मुंडे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार