ग्लोबल विकास ट्रस्टच्या प्रशिक्षणातून रेशीम शेतकऱ्याची उत्तुंग भरारी



एका बॅचमध्ये एका महिन्यात 1 लाखांपेक्षा अधिक उत्पादन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

ग्लोबल विकास ट्रस्टच्या शास्त्रीय प्रशिक्षणाचा आणि सातत्यपूर्ण तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेत बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने रेशीम उद्योग बंद करण्याच्या निर्णयापासून थेट एका बॅचमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक उत्पादन घेण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला आहे. परळी तालुक्यातील इंजेगाव येथील शेतकरी गोपाल गोविंद कराड हे मागील दोन वर्षांपासून तुती लागवड करून रेशीम उद्योग करत होते. मात्र अपेक्षित उत्पादन मिळत नसल्यामुळे त्यांच्या रेशीमच्या बॅचेस वारंवार फेल जात होत्या. त्यामुळे आर्थिक नुकसान होत होते आणि त्यांनी रेशीम उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

अशा परिस्थितीत मे महिन्यात ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्रात आयोजित रेशीम शेती प्रशिक्षणात त्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान शास्त्रीय पद्धतीने रेशीम संगोपन, बॅच व्यवस्थापन, रोग नियंत्रण, पानांचे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणानंतर मिळालेल्या आत्मविश्वासामुळे त्यांनी जुलै महिन्यात पुन्हा रेशीमची बॅच घेतली. त्यानंतर ग्लोबल विकास ट्रस्टच्या तज्ज्ञांनी बॅचचे नियोजन केले, वेळोवेळी प्लॉटला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीनुसार मार्गदर्शन केले आणि आवश्यक तांत्रिक सूचना दिल्या. या सातत्यपूर्ण सहकार्याचा परिणाम म्हणून गोपाला कराड यांनी एका बॅचमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक उत्पादन घेत उल्लेखनीय यश संपादन केले.

याबाबत गोपाल कराड म्हणाले, "माझ्या रेशीम शेतीमध्ये आजपर्यंत कधीही लाख रुपयांचे उत्पादन झाले नव्हते. बॅचेस वारंवार फेल जात असल्यामुळे मी रेशीम उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ग्लोबल विकास ट्रस्टच्या योग्य प्रशिक्षणामुळे आणि वेळेवर मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आज मी एका बॅचमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त उत्पादन घेऊ शकलो." गोपाल कराड यांची ही यशोगाथा योग्य प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्लॉट व्हिजिटच्या माध्यमातून रेशीम उद्योगात उत्कृष्ट उत्पादन मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत असून इतर शेतकऱ्यांसाठीही नवी दिशा देणारी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार