ना.पंकजा मुंडेंच्या दूरदृष्टीने परळीत उभे राहणार पशुसंवर्धनाचे 'पॉवर सेंटर'!...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ना.पंकजा मुंडे उद्या परळीत ; नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन

ना.पंकजा मुंडेंच्या  दूरदृष्टीने परळीत उभे राहणार पशुसंवर्धनाचे 'पॉवर सेंटर'!

परळी वैजनाथ दि. १४ --

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत परळी वैजनाथ येथे उभारण्यात येत असलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ व भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते व राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या स्वातंत्र्यदिनी दुपारी २ वाजता मोठ्या थाटात संपन्न होत आहे. 

        ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला, नंदागोळ रोड, येथे हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यास खा. बजरंग सोनवणे, आ.  धनंजय  मुंडे, आ. सतीश  चव्हाण, आ. बसवराज  पाटील, आ. डॉ. परिणय फुके, आ. विक्रम काळे, आ. प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ.नमिता मुंदडा, आ. संदीप क्षीरसागर, आ. विजयसिंह पंडित, आ. चैनसुख संचेती, आ. राजकुमार बडोले, आ. संजय मेश्राम, नगराध्यक्षा  पद्मश्री धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

       याशिवाय कार्यक्रमास मपमविवि, नागपूरचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव  डॉ. रामास्वामी एन., छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत , आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील, बीडचे जिल्हाधिकारी  विवेक जॉन्सन , तसेच मपमविवि, नागपूरचे कार्यकारी परिषद सदस्य  इंजि. गोविंद बापूराव नरवडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.परळीच्या शैक्षणिक, पशुसंवर्धन व कृषीपूरक क्षेत्राच्या विकासाला या महाविद्यालयामुळे नवी दिशा मिळणार आहे. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (पशुविज्ञान शाखा), मपमविवि, नागपूर डॉ. क्षितिज उपाध्ये, विद्यापीठ अभियंता प्रमोदकुमार तायडे आणि पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परळी वैजनाथचे प्रकल्प अधिकारी डॉ. प्राणेश येवतीकर यांनी आवाहन केले आहे

ना.पंकजा मुंडेंची दूरदृष्टी

-------------------

 पशुवैद्यकीय महाविद्यालय हे केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता पशुवैद्यकीय सेवा, प्राणी रुग्णालय, संशोधन, निदान सेवा तसेच पशुपालकांसाठी प्रशिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पामुळे परळी व परिसरातील विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच पशुपालकांनाही आधुनिक पशुवैद्यकीय सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.पंकजा मुंडे यांच्या दूरदृष्टीतून परळीच्या भूमीत उभे राहणारे हे पशुवैद्यकीय संकुल भविष्यात हजारो पशुपालकांना सेवा, शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि पशुसंवर्धन क्षेत्राला तज्ज्ञ मनुष्यबळ देणारे केंद्र ठरणार आहे. या निमित्ताने आज परळीच्या मातीत एक नवे स्वप्न आकार घेत आहे.शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी आणि संपूर्ण पशुसंवर्धन क्षेत्राच्या भविष्यात बदल घडविणारी मोठी पायाभूत गुंतवणूक ठरणार आहे.५६४ कोटींच्या या प्रकल्पाची भूमिपूजनाची ही कोनशिला परळीच्या विकासातील नवी झेप ठरणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार