संपादक बालासाहेब फड वंजारी समाज रत्न पुरस्काराने सन्मानित
परळी (प्रतिनिधी) —
वंजारी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार सोहळा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिव्यांग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब घुगे, सौ. यमुनाताई बाळासाहेब घुगे आणि डॉ. संकेत सानप यांच्या पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ‘दैनिक सोमेश्वर साथी’चे संपादक बालासाहेब फड यांना पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडून त्यांच्या न्याय-हक्कासाठी सातत्याने लेखणी चालविल्याबद्दल ‘वंजारी समाज रत्न पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.
बालासाहेब फड यांनी आपल्या निर्भीड, निःपक्ष आणि जनहितवादी पत्रकारितेतून शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला तसेच विविध सामाजिक वंचित घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे. जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून अनेक प्रकरणांमध्ये सकारात्मक कार्यवाही घडवून आणण्यासाठी त्यांच्या लेखणीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
या पुरस्कार सोहळ्यास माजी आमदार गोविंदराव केंद्रे, डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, भाजपा नेते गणेश भाऊ गित्ते, नगरसेविका सौ. दिपाली गिते, विवेक महाराज केदार, गुजरातचे प्रसिद्ध उद्योगपती मोहनराव घुगे, वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष राहुल जाधवर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे यांनी डॉ. संकेत सुमन तुकाराम सानप व बाळासाहेब घुगे यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी समाज एकजुटीच्या मोहिमेचे कौतुक करताना लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कार्याची व विचारांची आठवण करून दिली. समाजाने एकजुटीने पुढे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले.
भाजपा नेते गणेश भाऊ गित्ते व नगरसेविका सौ. दिपाली गिते यांनीही आयोजकांच्या पुढाकाराचे कौतुक केले. युवा पिढीला सोबत घेत समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणून भव्य-दिव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, पत्रकारिता यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. गुणवंतांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.
युवा नेतृत्वाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणण्याचा हा उपक्रम नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विनी सांगळे व डॉ. संकेत सानप यांनी केले.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुख्य आयोजक बाळासाहेब घुगे, सौ. यमुनाताई घुगे, डॉ. संकेत सानप, नवनाथ दराडे व बी. के. नागरे यांनी केले.संपादक बालासाहेब फड यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार मित्रपरिवार आणि समाजबांधवांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील पत्रकारिता व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा