श्रावण प्रथम दिन :  वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांनी घेतले दर्शन

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

     देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी झाली. सोनपेठ येथील श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी गुरुवारी सकाळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेत अभिषेक व पूजा केली.

 श्रावण महिन्याच्या प्रारंभामुळे वैद्यनाथ मंदिर परिसरात पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविक दर्शनासाठी दाखल होत होते. याच भक्तिमय वातावरणात नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले.

यावेळी वैजनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख यांनी नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचे स्वागत करून सत्कार केला. मंदिरातील धार्मिक विधीनंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. याप्रसंगी पत्रकार संजय खाकरे, शिरीष स्वामी, विकास हालगे, सोमेश्वर लिंगाडे  यांच्यासह पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार