शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
सरकारची दुष्काळाची घोषणा म्हणजे ‘लबाडाचं आवताण’; जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
परळी वैजनाथ : राज्य सरकारने दुष्काळाची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मदतीऐवजी जाचक अटी आणि ऑनलाइन प्रक्रियेचा गुंता दिला आहे. सरकारची दुष्काळाची घोषणा म्हणजे ‘लबाडाचं आवताण’ असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला.शिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे शिवसेनेच्या नेत्या सुषमा ताई अंधारे बीड़ जिला संपर्क प्रमुख अशोक सपकाळ मा.जिलाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे उप जिलाप्रमुख नारायण सातपुते यांच्या सूचनेवरून शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली परळी वैजनाथ तहसील कार्यालयात उप जिल्हाधिकारी अरविंद लाटकर साहेबांना निवेदन देण्यात आले.
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे अपेक्षित असताना शासनाने विविध जाचक अटी व नियम लावून मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ऑनलाइन प्रक्रियेच्या नावाखाली शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू असून, शासनाने तात्काळ या जाचक अटी रद्द करून कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट दुष्काळी मदत योजना राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नारायणराव सातपुते तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल शहर प्रमुख राजेश विभुते उप तालुका प्रमुख महेश केंद्रे तालुका सचिव प्रकास साळुंखे उप शहर प्रमुख विशाल गावंडे युवा सेनेचे उप जिल्हाधिकारी सचिन लोंढा मांडावा चे सर्कल प्रमुख श्रीकृष्ण नागरगोजे भोपळ्याचे शाखा प्रमुख लक्ष्मण मुंडे शाखा प्रमुख हरीश पालीवाल,विजय जाधव बालाजी नागरगोजे विष्णु खाडे शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा