६६ व्या वर्षी जलतरणात दमदार कामगिरी! राजाराम लोखंडेंनी ३०० मीटर पोहून पटकावला मराठवाड्यात प्रथम क्रमांक

परळी / प्रतिनिधी 

वयाच्या ६६व्या वर्षीही जिद्द, चिकाटी आणि फिटनेसचा आदर्श घालून देत परळी येथील राजाराम विश्वनाथराव लोखंडे यांनी जलतरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘AQUA 10 सहनशक्ती जलतरण स्पर्धेत’ त्यांनी तब्बल ३०० मीटर अंतर यशस्वीपणे पोहत पूर्ण केले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना ‘मराठवाड्यात प्रथम – स्विमिंग गुरु पूल केअर’ असे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

चंपावती क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राजाराम लोखंडे यांनी सहभाग घेतला. वयाची ६६ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी ३०० मीटर अंतर यशस्वीपणे पूर्ण करत आपल्या सहनशक्तीचे आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवले.जलतरणातील त्यांच्या या कामगिरीबद्दल सहनशक्ती, चिकाटी आणि जिद्दीचे विशेष कौतुक करण्यात आले असून, त्यांना ‘मराठवाड्यात प्रथम’ या गौरवाने प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

राजाराम लोखंडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जलतरण क्षेत्रातील मान्यवर, क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार आणि परळीकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे परळीच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!