हे कार्यालय सर्व सामान्य नागरिकांसाठी माध्यम बनेल...

 ना. पंकजा मुंडे यांच्या बीड संपर्क कार्यालयाचे आगळेवेगळे लोकार्पण ; मुंडे साहेबांची प्रतिमा अन् अनाथ मुलींच्या साक्षीने केला प्रवेश




सर्व सामान्य नागरिकांशी सुलभ संवाद आणि त्यांचे प्रश्न गतीने सोडविण्यासाठी हे कार्यालय माध्यम बनेल - ना. पंकजा मुंडे

बीड दि. २७ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी शहरात आपले नवे संपर्क कार्यालय सुरू केले असून त्याचे आगळेवेगळे लोकार्पण आज मोठ्या थाटात पार पडले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची प्रतिमा आणि अनाथ मुलींच्या साक्षीने त्यांनी नव्या कार्यालयात प्रवेश करून लोकार्पण केले. जनसेवेचा वसा अधिक दृढ करून सर्व सामान्यांचे प्रश्न या कार्यालयाच्या माध्यमातून जलदगतीने सोडविले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

    नगर रोडवरील तहसील कार्यालयाच्या समोर साधना अव्हेन्यू व्यापारी संकुलात हे संपर्क कार्यालय आजपासून जनसेवेत रूजू झाले. दुपारी ना. पंकजाताई मुंडे यांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या लोकसेवेचा वसा अधिक क्षमतेने चालवण्याचा संकल्प घेऊन त्यांची प्रतिमा हातात घेऊन आणि कु.गायत्री रामकिसन सवंडकर, वेदिका विष्णू आगे, हर्षदा विद्यासागर सोनवणे या अनाथ मुलींच्या हस्ते फित कापून संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.याप्रसंगी  माजी खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, माजी आमदार  बदामराव पंडित, केशवराव आंधळे, युवा नेते अक्षय मुंदडा, योगेश क्षीरसागर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, आदित्य सारडा तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे कार्यालय सर्व सामान्य नागरिकांसाठी माध्यम बनेल

---------

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची केले. त्यांच्या सेवावृत्तीचा संकल्प दृढ करताना अधिकाधिक नागरिकांशी संवाद व्हावा, त्यांचे प्रश्न सोडविता यावेत या हेतूने बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे नवे संपर्क सुरू केले आहे. या कार्यालयातून प्रत्येकाच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मार्गी लावताना नागरिकांशी थेट संपर्क आणि संवाद साधण्याचे लोकोपयोगी कार्य या संपर्क कार्यालयातून होईल असा विश्वास ना. पंकजाताईंनी यावेळी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!