४८व्या वर्षात पदार्पण; वैद्यनाथ तरुण दुर्गोत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर

रोहित मोदी अध्यक्ष, शिवराज कछवा उपाध्यक्ष; अक्षय शिंदे सचिव तर महादेव तिडके कोषाध्यक्ष

परळी वैजनाथ,  परळी शहरातील नेहरू चौक (तळ) येथील श्री वैद्यनाथ तरुण दुर्गोत्सव मंडळाच्या ४८व्या वर्षातील दुर्गोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुर्गादेवी स्थापना व आगामी उत्सवाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

मंडळाचे संस्थापक विजय चौहाण (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस जयराज देशमुख, डॉ. अंकुश जबदे, बिभीषणदादा तिडके, नितीन शिंदे, भरत महाराज जोगी, अमर देशमुख सर, राजूकाका देशमुख, अभिजीत देशमुख, पिलू ठाकूर, उमाकांत विभुने, राजभाऊ शिंदे, अमर चौहाण, ॲड. भूषण देशमुख, बाळू देशमुख, नीरज देशमुख, इंद्रजित विभुने, साहेबअण्णा नागेश्वर, राजाराम तोरडमल, संजय कुकडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

बैठकीत आगामी दुर्गोत्सवाच्या नियोजनासह मंडळाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी रोहित मोदी, उपाध्यक्षपदी शिवराज कछवा, सचिवपदी अक्षय शिंदे, तर कोषाध्यक्षपदी महादेव तिडके यांची निवड करण्यात आली. सहकोषाध्यक्ष म्हणून दीपक भैय्या नागेश्वर, स्टेज प्रमुख म्हणून रवी दर्शन, तर कार्याध्यक्षपदी अजय (रॉबिन) ठाकूर यांची जबाबदारी सोपविण्यात आली.

मंडळाच्या स्थापनेपासून धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून दुर्गोत्सवाची परंपरा जपली जात आहे. यंदाच्या ४८व्या दुर्गोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या दृष्टीने मंडळाच्या वतीने नियोजन सुरू करण्यात आले आहे.

बैठकीस ऋषी दुबे, प्रमोद जाधव, रजत ठाकूर, नामदेव भालेराव, सुदर्शन विभुने, शिवराज ठाकूर, जयदीप ठाकूर, गणेश गवळी, वैजनाथ कुलथे, अभिजित कदम, भैय्यू ठाकूर, रोहित शिंदे, प्रणव स्वामी, माऊली वाघुमारे, रवी दर्शन, श्रीकांत नागेश्वर, अजय रघुवंशी, महिपाल ठाकूर, चरण रघुवंशी, लक्ष्मणसिंग ठाकूर, विक्रांतसिंग ठाकूर, चरणसिंग ठाकूर, संजय घुंमरे, अविनाश घुंमरे, बालाजी कुलथे, मुंजा कांदे, गोविंद आव्हाड, दिनेश आव्हाड यांच्यासह मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.परंपरेचा वारसा जपत यंदाचा दुर्गोत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्धार यावेळी मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!