मातृ-पितृ स्मरणार्थ तुकाराम गाथा पारायण, एकनाथी भागवत कथा प्रवचन व कीर्तनांचे आयोजन
मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - भास्करमामा चाटे
परळी वैजनाथ : प्रतिनिधी...
मातृ-पितृ स्मरणार्थ परळी-बीड रोडवरील मुक्ताई लॉन्स येथे तुकाराम गाथा पारायण,एकनाथी भागवत कथा प्रवचन व मान्यवर कीर्तनकारांची कीर्तनसेवा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भास्करमामा चाटे व परिवाराने केले आहे.
या कार्यक्रमाचा प्रारंभ शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी तुकाराम महाराज गाथा पारायणाने होणार आहे. या कालावधीत संतवाङ्मय, हरिनाम, भागवत कथा व प्रवचनांच्या माध्यमातून आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजता ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे (वारजेकर), पुणे यांचे हरिकीर्तन होणार आहे. तसेच शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ वाजता ह.भ.प. ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगावकर, अध्यक्ष सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी, यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या संयोजनात ह.भ.प.अमोल महाराज गुट्टे, मार्गदर्शक हभप रामेश्वर कोकाटे, हभप गोविंद म. मुंडे कनैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, श्री. बाळासाहेब लटपटे चंद्रभागा आश्रम वारकरी शिक्षण संस्था आणि अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळ यांचा सहभाग आहे. भाविकांनी या सप्ताहातील धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सौ. शोभाताई व श्री. भास्करराव चाटे (मामा), निळकंठ चाटे,दिनकरचाटे,सौ. स्मिता व ऍड गिरीशराव मुरकुटे,सौ. अर्चना व श्री. श्रीकांत चाटे, सौ. वैशाली व श्री. शशिकांत चाटे तसेच डॉ. सौ. गौरी उर्फ स्वप्ना व श्री. रविकांत चाटे व संपूर्ण चाटे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा