भावपूर्ण श्रद्धांजली!!

 दुःखद वार्ता: प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व पुरुषोत्तम देशमुख (सिरसाळकर) यांचे निधन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी :

परळी येथे वास्तव्यास असलेले सिरसाळा येथील प्रतिष्ठित व्यक्तीमत्त्व पुरुषोत्तम रंगराव देशमुख(नाना) यांचे बुधवारी रात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, पुणे येथील फायरकॉन कंपनीचे प्रमुख हरीश देशमुख, तसेच परळीतील प्रतिष्ठित व्यापारी गिरीश देशमुख, मनीष देशमुख ही तीन मुले,एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर परळी येथील मोक्षधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने देशमुख कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!