मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन...
तालुका विधी सेवा समिती, परळी वै. यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी वॉकेथॉन रॅलीचे आयोजन परळी वैजनाथ, प्रतिनिधी... स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बालकांचे हक्क, संरक्षण, शिक्षण आणि न्याय याबाबत जनजागृती करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती, परळी वै. यांच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी वॉकेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहण समारंभानंतर दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, परळी वै. येथून मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी या वॉकेथॉनला सुरुवात होणार आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड, तालुका विधी सेवा समिती, परळी वै., वकील संघ परळी वै., तालुका पोलीस प्रशासन तसेच इंटरनॅशनल जस्टिस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, पोलीस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बालकांशी संबंधित विविध...