कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न
ना. पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाची दमदार टीम जाहीर कार्यकारिणीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न बीड दि. २७ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय आंधळे यांनी जिल्हा युवा मोर्चाची कार्यकारिणी घोषित केली आहे. युवा मोर्चाच्या या नव्या दमदार टीममध्ये समाजातील सर्व जाती धर्माच्या युवकांना प्राधान्य देऊन एक चांगला संदेश देण्यात आला आहे. ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक फळी मजबूत करण्याच्या दृष्टीने युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना न्याय दिला आहे. नव्या कार्यकारिणीत समाजातील ओबीसी, मायक्रो ओबीसी, मराठा, मुस्लिम, मागासवर्गीय आदी विविध जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा योग्य प्रयत्न करण्यात आला आहे. यात ७ सरचिटणीस, ११ उपाध्यक्ष, १५ सचिव, १० सदस्य आणि एक कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. *प्रत्येकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू - ना. पंकजाताई* -------- संघटनेत असंख्य कार्यकर्ते असताना प्रत्येकांना...