पोस्ट्स

इमेज
  जेजुरी संस्थानचे विश्वस्त तसेच जेजुरीचे नगराध्यक्ष यांच्यासह परळीत मान्यवरांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन परळी वैजनाथ : प्रतिनिधी — श्रावण महिन्याच्या पावन पर्वात धार्मिक स्थळांना भेटी देत असताना मार्तंड देवस्थान, जेजुरीचे विश्वस्त तथा जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप भैय्या बारभाई, नगरसेवक योगेश भैय्या जगताप, जेजुरीचे सामाजिक कार्यकर्ते वैभव कोरपड, सुरेश राऊत व प्रशांत कापसे या मान्यवरांनी परळी वैजनाथ येथे पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी परळीकरांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनीही त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक राजेंद्र सोनी यांची उपस्थिती होती.जेजुरी आणि परळी या दोन प्रमुख धार्मिक स्थळांमधील भक्तिभावाचे नाते अधिक दृढ करणारा हा प्रसंग ठरला. दर्शनावेळी मान्यवरांनी प्रभू वैद्यनाथाची पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 

पुणे येथील ज्योतिष महासंमेलनामध्ये पुरस्कार प्रदान

इमेज
 डॉ.एकनाथ घ.मुंडे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान ज्योतिष शास्त्रातील अद्वितीय कार्याबद्दल पुणे येथील ज्योतिष महासंमेलनामध्ये पुरस्कार प्रदान _____________________________ परळी (प्रतिनिधी):दिनांक ३१ ऑगस्ट महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरामध्ये  दिनांक २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान संपन्न झालेल्या ज्योतिष महासंमेलनामध्ये   डॉ.एकनाथ घनश्यामराव मुंडे यांना ज्योतिष शास्त्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. जन्मगाव नाथरा असणारे डॉ.एकनाथ घ. मुंडे हे परळी वैजनाथ येथील रहिवासी असून गेली ५० वर्ष श्रीनाथ हॉस्पिटल परळी वैजनाथ येथे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या मूलमंत्राला एकनिष्ठ राहून समाजातील गरीब गरजू आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या  रुग्णांची सेवा करीत आहेत आणि रुग्णसेवेसोबत समाजसेवेचा वसाही त्यांनी घेतला आहे. वैद्यकशास्त्रासोबतच ज्योतिष शास्त्राचा अभ्यास आणि आवड  असणारे डॉ. एकनाथ मुंडे यांनी वैद्यकशास्त्राला ज्योतिषशास्त्राची साथ जोडली आणि हजारो रुग्णांवर ज्योतिषवैद्यक शास्त्राच्या पद्धतीने उपचार करून त्यांना त्या...
इमेज
  कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाचे एक दिवसीय रा से यो , शिबीर उत्साहात   अंबाजोगाई : येथील कला व वाणिज्य महिला महाविद्यालय चा राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत मौजे श्रीपत रायवाडी येथे एक दिवसीय शिबिर 25 ऑगस्ट रोजी उत्कृष्टरित्या संपन्न झाले.        या शिबिरात गावातील शेतकरी पुरुष व महिला साठी उद्बोधन कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ कृषी विद्यापीठ डॉ. अरुण गुट्टे यांनी कमी पर्जन्यमानात सोयाबीन पिकाची घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तर तालुका कृषी अधिकारी श्री विजयकुमार पवार यांनी शेतातील तन नियोजन, एल निनो  चा परिणाम व त्यावरील उपाय या विषयी माहिती दिली. गावातील प्रगतशील शेतकरी श्री राजेंद्र जाधव यांनी जलसंधारण दिनानिमित्त पाणी बचतीचे महत्त्व व त्यावरील उपाय याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य मंचक मोरे यांनी पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन कसे करावे हे सांगितले. या कार्यक्रमास गावातील महिला व पुरुष शेतकरी, गावच्या सरपंच सौ. सुमनताई पवार,रासे...

आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल शहराध्यक्षपदी बाळकृष्ण फुले यांची निवड परळी वैजनाथ : प्रतिनिधी.     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल परळी वै. शहराध्यक्षपदी बाळकृष्ण  अनंतराव फुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र आज राज्याचे माजी मंत्री तथा परळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा ना. सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार बाळकृष्ण फुले यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष आयुब खान पठाण, सरचिटणीस अनंत इंगळे आदींसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी शहर व परिसरातील ओबीसी समाजाच्या विविध  प्रश्नांनवाचा फोडण्यासाठी तसेच राष्ट...

मैदवाडी सेवानगर तांडा येथील प्रकार; तरुणाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा...

इमेज
अल्पवयीन मुलीला दुचाकीवर जबरदस्तीने नेले; गैरवर्तनासह जीवे मारण्याची धमकी दवाडी सेवानगर तांडा येथील प्रकार; तरुणाविरुद्ध  विविध कलमांतर्गत गुन्हा परळी वैजनाथ, प्रतिनिधी  : परळी तालुक्यातील मैदवाडी सेवानगर तांडा परिसरात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घेऊन जात तिच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध POCSO कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता मैदवाडी सेवानगर तांडा परिसरात हा प्रकार घडला आहे. रवी रामा पवार रा. मैंदवाडी सेवा नगर तांडा येथील आरोपीने अल्पवयीन मुलीला कथितरीत्या बळजबरीने मोटारसायकलवर बसवून नेले. त्यानंतर तिच्याशी लज्जा निर्माण होईल असे गैरवर्तन केले. या घटनेनंतर आरोपीने संबंधित मुलगी तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी म...

गृह, वन, नगरविकाससह विविध विभागांत संधी...

इमेज
माजी अग्निवीरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; विविध विभागांत १००० अधिकसंख्य पदे निर्माण होणार शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्तीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन; गृह, वन, नगरविकाससह विविध विभागांत संधी मुंबई : प्रतिनिधी भारतीय सशस्त्र दलातील चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांना राज्य शासनाच्या विविध शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माजी अग्निवीरांसाठी गट-क संवर्गातील सुमारे १००० अधिकसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केला. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सशस्त्र दलात चार वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांपैकी नियमानुसार २५ टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले जाते. उर्वरित माजी अग्निवीरांना त्यांच्या प्रशिक्षणाचा, कौशल्याचा आणि शारीरिक क्षमतेचा उपयोग करून राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. माजी अग्निवीरांना नियुक्ती देण्...

सर्व स्तरातून अभिनंदन.........!!!!

इमेज
  कमी कालावधीत उत्कृष्ट  काम : नाथरा येथील रमेश मुंडे यांचा रेल्वे सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान परळी वैजनाथ : प्रतिनिधी          परळी वैजनाथ तालुक्यातील नाथरा येथील रहिवासी रमेश जगन्नाथ मुंडे यांनी सेंट्रल रेल्वेच्या सोलापूर विभागात मेकॅनिकल विभागात कार्यरत असताना अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांचा १५ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात आला. रेल्वे सेवेत कर्तव्यनिष्ठा, समर्पण आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.              रमेश मुंडे हे सेंट्रल रेल्वेच्या सोलापूर डिव्हिजनमध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत आहेत. आपल्या कामातील तत्परता, जबाबदारीची जाणीव आणि समर्पित वृत्तीच्या माध्यमातून त्यांनी कमी कालावधीत वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांचा गौरव करण्यात आला. नाथरा या ग्रामीण भागातून पुढे येत रेल्वेसारख्या महत्त्वाच्या सेवाक्षेत्रात कार्यरत राहून...