पोस्ट्स

कायम प्रवास भत्ता लागू करण्याबाबत लवकरच निर्णय

इमेज
पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे सकारात्मक निर्णय पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता लागू करण्याबाबत लवकरच निर्णय मुंबई, दि. २२ : पशुधन पर्यवेक्षक / सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता लागू करण्यासंदर्भात सकारात्मक असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच राज्यात 10 वी नंतर दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम बंद करून 12 वी विज्ञान नंतर दोन वर्षाचा पशुविज्ञान विषयासह पदविका अभ्यासक्रम चालू करण्यासंदर्भात तपासून निर्णय घेण्यात येईल, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले. पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी गट ब संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा कायम प्रवास भत्ता, पदांचे तर्कसंगत वाटप, पदोन्नती, रिक्त पदभरती, पदविका अभ्यासक्रमाचा दर्जा, तालुका स्तरावरील अधिकार तसेच पशुवै...

महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ..

इमेज
श्री गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात २५ युवकांचे रक्तदान परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) - येथील हनुमान मंदिर, सुभाष चौक परिसरातील श्री गणेश मंडळाच्या वतीने रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सामाजिक बांधिलकी व सेवाभाव जपत रक्तदान शिबिर तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २५ युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान—रक्तदान करून जीवनदान द्या” या संदेशाने प्रेरित होऊन युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिरानंतर दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांसह शहरातील अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रक्तदान हे केवळ रक्तदान नसून गरजू रुग्णाच्या जीवनासाठी मोलाचे योगदान देण्याचे कार्य आहे. त्यामुळे युवकांसह नागरिकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात...

लाभ घेण्याचे आवाहन..

इमेज
श्री गणेश मंडळातर्फे आज रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन परळी वैजनाथ (संजय क्षिरसागर) - येथील हनुमान मंदिर, सुभाष चौक परिसरातील श्री गणेश मंडळाच्या वतीने मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत रक्तगट तपासणी (आरोग्य तपासणी) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत श्री गणेश मंडळाने या आरोग्यविषयक उपक्रमाचे आयोजन केले आहे. नागरिकांना आपल्या रक्तगटाची माहिती असणे अत्यंत आवश्यक असून, भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासल्यास ही माहिती उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. हनुमान मंदिर, सुभाष चौक, परळी वैजनाथ येथे हे शिबिर होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, तसेच या सामाजिक उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

छायाचित्रकार संघटनेच्या गणेशोत्सवात नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्या हस्ते आरती..

इमेज
वडिलांकडून चित्रकलेचा वारसा; छायाचित्रकारांच्या मंडळात सहभागी होताना मनोमन आनंद - नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी छायाचित्रकार संघटनेच्या गणेशोत्सवात नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्या हस्ते आरती परळी वैजनाथ :  प्रतिनिधी....       माझ्या वडिलांकडून आमच्या घरात चित्रकलेचा वारसा मिळाला. ते कला शिक्षक आणि छायाचित्रकार होते. त्यामुळे छायाचित्रकारांच्या मंडळात सहभागी होताना मला मनोमन आनंद होत असून, या क्षेत्राशी माझे विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे अशा भावनिक शब्दांत नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी आठवणींना उजाळा दिला.       छायाचित्रकार संघटना, परळी वैजनाथ यांच्या वतीने मराठवाड्यातील पहिल्याच अशा स्वरूपाच्या श्रीगणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या गणेशोत्सवानिमित्त आयोजित श्रीआरतीसाठी नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी तसेच विद्यमान नगरसेवक महादेव रोडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी श्रीआरतीनंतर उपस्थितांशी संवाद साधताना नगराध्यक्षा धर्माधिकारी वडिलांच्या आठवणीत रमून गेल्या. या गणेशोत्सवासाठी छायाचित्रकार संघटनेने...
इमेज
अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात डॉ. झाकीर हुसेन उर्दू विद्यालयाचा यशस्वी सहभाग परळी (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी बीड येथे जिल्हास्तरीय 'अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बीड जिल्ह्यातील एकमेव उर्दू शाळा डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मेळाव्याचे आयोजन आणि उद्दिष्टेहा मेळावा १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून बीड येथील राजस्थानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पार पडला. या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची निवड करण्यात आली होती.या मेळाव्याची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कार्यकारणभाव समजावून सांगून विश्लेषणात्मक विचारांची जागृती करणे.स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवून भावी वैज्ञानिकांना त्यांच्या विचारांच्या आदान-प्रदानाची संधी देणे. देशातील प्रज्ञावान युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे. शेख मासीरा हिचे प्रभावी स...

पाच भावंडांच्या संघर्षातून उभा राहिलेला सौर ऊर्जा क्षेत्रातील यशस्वी प्रवास...

इमेज
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या पाच भावंडांच्या जिद्दीला ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार प्रदान  प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते गौरव छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  येथील ‘द ट्रिट इंपीरियल हॉटेल’ (The Treat Imperial Hotel) येथे Reseal.in या संस्थेच्या वतीने नुकताच अत्यंत दिमाखदार पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात सौर ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय व पथदर्शी कामगिरी करणाऱ्या PBR Construction & Renewable Energy Pvt. Ltd. या ‘मराठवाडा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शून्यातून विश्व निर्माण कसे करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे PBR Construction & Renewable Energy Pvt. Ltd. ची वाटचाल आहे. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना, केवळ पाच भावंडांनी केलेल्या अफाट मेहनत, जिद्द आणि अतुट एकीच्या बळावर हा व्यवसाय उभा केला आहे. सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी आपली सुरुवात केली. आज ही कंपनी सौर ऊर्जा (Solar Energy) क्षेत्रा...

बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्त्याचे रुंदीकरण होणार; १०४ कोटीची निविदा प्रसिद्ध

इमेज
आश्वासनाची पूर्ती ; ना. पंकजाताई मुंडेंनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्त्याचे रुंदीकरण होणार; १०४ कोटीची निविदा प्रसिद्ध बीड।दिनांक १६। परळी मतदारसंघातील बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्ता रुंदीकरणाला आता गती येणार असून यासाठी १०४ कोटीची निविदा  तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे, या कामासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.    निवडणुक प्रचाराच्या वेळी ना. पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेत  बर्दापुर ते लोखंडी सावरगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी केली होती, हा रस्ता अरूंद असल्याने यावर वारंवार अपघात झाले होते, त्यामुळे ही मागणी पुढे आली होती, यावर गडकरी यांनी रस्त्यासाठी लवकरच निधी देऊन काम सुरू करू असे आश्वासन दिलं होते. ना.पंकजाताईंनी या मागणीसाठी गडकरी यांची काही महिन्यापुर्वी दिल्ली येथे भेटही घेतली होती. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यां...