कायम प्रवास भत्ता लागू करण्याबाबत लवकरच निर्णय
पशुसंवर्धन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे सकारात्मक निर्णय पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता लागू करण्याबाबत लवकरच निर्णय मुंबई, दि. २२ : पशुधन पर्यवेक्षक / सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता लागू करण्यासंदर्भात सकारात्मक असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच राज्यात 10 वी नंतर दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम बंद करून 12 वी विज्ञान नंतर दोन वर्षाचा पशुविज्ञान विषयासह पदविका अभ्यासक्रम चालू करण्यासंदर्भात तपासून निर्णय घेण्यात येईल, असे पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज येथे सांगितले. पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी गट ब संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा कायम प्रवास भत्ता, पदांचे तर्कसंगत वाटप, पदोन्नती, रिक्त पदभरती, पदविका अभ्यासक्रमाचा दर्जा, तालुका स्तरावरील अधिकार तसेच पशुवै...