इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS-आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज ०५ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १२९

 आजचा कोविड अहवाल: परळी तालुक्याचा आकडा आज ०५ पाॅझिटिव्ह जिल्ह्यात १२९



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....


        आरोग्य प्रशासनाच्या वतीने कोविड -१९ रुग्णांच्या बाबतीत दैनंदिन अहवाल जाहीर करण्यात येतो. गेल्या अनेक दिवसात  बीड जिल्ह्याच्या दैनंदिन covid-19 अहवालात परळी तालुक्यातील संख्या कमी झालेली दिसत आहे. आजच्या अहवालात परळी तालुक्यातील संख्या ०५   आहे.   

                आजच्या कोविड- 19 दैनंदिन अहवालात जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या१२९ आहे.संख्या ओसरत असतानाच परळी तालुक्याची संख्या हळूहळू झिरो पाॅझिटिव्हकडे जाताना दिसत होती. मात्र आज  परळी तालुक्याची संख्या ०५ आहे.  कोरोना संसर्गाची साखळी  संपुर्णतः तुटलेली दिसून येत नाही. झिरो कोरोणा करण्याच्या दृष्टीने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत आवश्यकता असून कोविड विषयक नियमांचे पालन करावे व सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर, आदी मूलभूत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....