MB NEWS-महाशिवरात्र : वैद्यनाथ मंदिरचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार ; यात्रा भरण्याबाबतचा निर्णय मात्र शासनस्तरावर

  महाशिवरात्र : वैद्यनाथ मंदिरचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार ; यात्रा भरण्याबाबतचा निर्णय मात्र शासनस्तरावर 









Click:- 🏵️ *ज्योतिर्लिंग वैद्यनाथ प्रभुंचा महाशिवरात्र उत्सव;सध्या काय सुरू आहे मंदिरात? पहा : रिपोर्ट 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचा महाशिवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने यावर्षी ही होणार आहे.भाविकांसाठी दर्शन व वैद्यनाथ मंदिरचे सर्व उत्सव पारंपरिक पद्धतीने होणार आहे.यात्रा भरण्याबाबत निर्णय मात्र शासनस्तरावरून घेण्यात येणार आहे.

       बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील श्री प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी  महाशिवरात्रीच्या दिवशी  येणाऱ्या शिवभक्तांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी  वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात सर्व व्यवस्थेचा आढावा  शुक्रवारी अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांच्या अध्यक्षतेखाली वैजनाथ मंदिराच्या हॉल मधील बैठकीत घेण्यात आला. या आढावा बैठकीत महाशिवरात्रीची दर्शनाच्या निमित्ताने  काय काय तयारी करण्यात आली आहे यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी सर्व विभाग  प्रमुखाकडून माहिती घेतली व योग्य त्या सूचना दिल्या. एक मार्च रोजी महाशिवरात्र उत्सव श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने साजरा केला जाणार आहे महाशिवरात्रीत वैद्यनाथच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येणार असल्याने श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने महिला, पुरुष व धर्मदर्शन अशा तीन रांगा लावण्यात येणार आहे. हजारो भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून मंदिराच्या पायऱ्यावर बॅरिकेट उभारण्याचे काम पूर्ण होत आले आहे 

           एक मार्च रोजी महाशिवरात्र असल्याने वैद्यनाथ मंदिरात दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे.शहरात यात्रा भरण्यासंदर्भात मात्र या बैठकीत काही निर्णय झाला नाही. शासनाचे आदेशानुसार  यात्रे संदर्भातला निर्णय  घेतला जाईल अशी माहिती तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी बोलताना दिली.


Click:- _रशिया व आसपासच्या प्रदेशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे या विद्यार्थ्यांबाबत सर्वांना काळजी वाटत आहे.भारतातील *जवळपास 20 हजार विद्यार्थी* युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी *युक्रेनमध्येच वैद्यकीय शिक्षणासाठी का जात असावेत?* असा प्रश्न निर्माण होतो. याचीही महत्त्वपूर्ण कारणे आहेत.काय आहेत ती कारणं........._  *सविस्तर वाचा* 

Click:दिवसभराच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी MB NEWS YouTube channel ला नक्की Subscribe करा.

 --------------------हे देखील वाचा-पहा-----------------------

 *आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२२*

👉*विषबाधा: दोन मुली एक मुलगा मृत्यूमुखी तर आईची प्रकृती चिंताजनक* 



•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.🌑  

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार