इमेज
सामाजिक कार्यकर्ते संतोष  शिंदे यांच्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी; सकल मराठा समाजाचे निवेदन परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भैय्या (जीवनराव) शिंदे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात आज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संतोष शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा वस्तुस्थितीला धरून नसून संबंधित फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. सदर घटना ही किरकोळ मतभेदातून घडलेली असून, चोरी करणे किंवा गंभीर स्वरूपाची इजा पोहोचविणे असा कोणताही हेतू संतोष शिंदे यांचा नव्हता, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पुढे म्हटले आहे की, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या संतोष भैय्या शिंदे यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून परळी तालुक्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या...

MB NEWS-पंकजाताई मुंडेंनी बीडच्या उदयोन्मुख गायिकेला घेतलं दत्तक !

 पंकजाताई मुंडेंनी बीडच्या उदयोन्मुख गायिकेला घेतलं दत्तक !



*उत्तम गुरू मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न* 


मुंबई ।दिनांक १७। 

मूळची बीडची असलेली शामल सौंदरमल या गुणी गायिकेला एक उत्तम गुरू मिळेपर्यंत भाजपच्या राष्ट्रीय सचिव  पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतले आहे. पंकजाताई मुंडे यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्टद्वारे  याबाबतची माहिती दिली. 

Click -🏵️होळी पेटवून का मारल्या जातात बोंबा?? घ्या जाणुन.*


  शामल सौंदरमल आणि तिचे कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास असले तरीही ते मूळचे बीड येथील आहेत. रोजीरोटी कमावण्यासाठी मुंबईत आलेल्या या कुटुंबाचे अहोरात्र कष्ट सुरु असतात. शामलची आई किशाबाई सौंदरमल यांचाही आवाज दैवी देणगी असल्यागत असून त्यांचा व्हिडिओदेखील यापूर्वी व्हायरल झाला होता. किशाबाई या दिव्यांग आहेत. पंकजाताई मुंडे आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाचा गौरव करणारं काव्य किशाबाई सौंदरमल यांनी लिहिलं होतं. अत्यंत साधेपणाने घरात कणिक मळताना त्यांनी गायलेलं हे गाणं पंकजाताई मुंडे यांनीच फेसबुकवर पोस्ट केलं होत. त्यानंतर आता किशाबाई यांची मुलगी शामल हिचं ‘ऐ मेर वतन के लोगो..’ हे गाणं पंकजाताईंनी फेसबुकवर पोस्ट केलं असून शामलला एक उत्तम गुरु लाभेपर्यंत आपण हिला दत्तक घेतोय, असं आश्वासनही त्यांनी दिलंय.

युट्यूबवर पहा: Click -🏵️ *पंकजाताई मुंडे यांनी दत्तक घेतलेल्या उदयोन्मुख गायिकेच्या मधुर आवाजाची एक झलक......!*

••••

•••••••••••••••••••••••••••••••••••••

Click - वडखेल येथे शाॅक लागुन शेतकऱ्याने गमावला जीव

⬛ *सत्तावीस कट्टयाच्या हरभरा थप्पीतून सहा कट्टे चोरुन नेले*

Click -🏵️ *पंढरपूरात आमलकी एकादशी निमित्त मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास......!

Click -⬛ *देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटीसीचे परळीत भाजपकडून दहन.

Click -🏵️ *एका आवलिया 'योगी भक्ताची' परळीत येऊन 'संकल्पपुर्ती'.* _

Click -🏵️ *अन् महाशिवरात्री नंतर परळीत भरली प्रासंगिक यात्रा....!* 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

CONTACT👉 🌑MB NEWS बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क-   महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717. 🌑

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••              जाहिरात/ADVERTIS

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या