इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं उद्या दिव्यांग तपासणी शिबीर

 लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा नववा स्मृतिदिन ; ३ जूनला  अभिवादनासाठी राज्यभरातून येणार मुंडे प्रेमी



रामायणाचार्य ढोक महाराजांचे सुश्राव्य कीर्तन व महाप्रसाद


गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं उद्या दिव्यांग तपासणी शिबीर


परळी वैजनाथ  । दिनांक ०१। 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या स्मृतिदिनी म्हणजे येत्या ३ जून रोजी  लोकनेत्याच्या अभिवादनासाठी  आमदार, खासदारांसह राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर याठिकाणी उसळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी सुरू असून मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.


   लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्याच्या काना कोप-यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. गतवर्षी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान गडावर आले होते, त्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम पार पडला होता. 


  यावर्षी ३ जूनला गडावर दुपारी १ ते ३ वा. दरम्यान ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे तद्नंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्व आजी माजी आमदार, खासदार, मान्यवर   नेते मंडळी व कार्यकर्ते यावेळी  उपस्थित राहणार आहेत. 


*उद्या दिव्यांगासाठी तपासणी शिबीर*

----------------------------

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आतापर्यंत लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा पाडला आहे. कोरोना काळात सेवा यज्ञातून दिलेला मदतीचा हात, महा आरोग्य शिबीर, अपंगाना साहित्य वाटप, बेरोजगारांना नोक-या, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत, सामुदायिक विवाह सोहळा आदी विविध उपक्रम राबवून सामाजिक उत्थानाचा वसा घेतला आहे. लोकनेत्याच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकाराने आणि समाजकल्याण विभाग भारत सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने उद्या २ जून रोजी सकाळी १० ते सायं. ६ वा. दरम्यान शहरातील उप जिल्हा रूग्णालयात  दिव्यांगासाठी नोंदणी व तपासणी शिबीराचे  आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचा लाभ घेण्याचं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान 

३ जून रोजी गोपीनाथ गडावर   सर्व नागरिक तसेच  सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या