इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध ; पंकजाताई मुंडेंसह २१ संचालक विजयी

कारखान्याच्या हितासाठी बिनविरोध निवडीचा पायंडा ; सर्वांचं सहकार्य अपेक्षित - पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केला विश्वास


परळी वैजनाथ ।दिनांक ०१।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक अखेर बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पंकजाताई मुंडेंसह बिनविरोध निवडून आलेल्या २१ संचालकांची नांवे आज जाहीर केली. दरम्यान, राजकारण न आणता कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही व  आ. धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला व सकारात्मक पायंडा यातून पडेल असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. 


   वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू होती. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने उर्वरित २१ संचालक बिनविरोध विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.


कारखान्याचं हित महत्वाचं म्हणूनच  बिनविरोध निवडीचा निर्णय

----------------

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मोठया कष्टातून आणि मेहनतीनं वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला, पण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे कारखाना आर्थिक अडचणीतून जात आहे. आताच्या हया परिस्थितीत कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून त्याचं हित पाहणं महत्वाचं होतं म्हणून आम्ही व आ. धनंजय मुंडे यांनी मिळून  बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला. यातून चांगला व सकारात्मक पायंडा पडेल असा विश्वास विद्यमान अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. ऊस उत्पादक सभासद आणि नवनिर्वाचित संचालकांचं सहकार्य यासाठी लाभणार आहे ते निश्चित मिळेल असंही त्या यावेळी म्हणाल्या.


हे संचालक बिनविरोध विजयी

----------

पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या गटाचे बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे 

*पांगरी गट* - श्रीहरी मुंडे, रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे

*नाथरा गट* - सतीश मुंडे, राजेश गिते, अजय मुंडे *परळी गट* - पांडूरंग फड,हरिभाऊ गुट्टे,सचिन दरक,*सिरसाळा गट* - सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतु कराड, 

*धर्मापूरी गट* - शिवाजीराव गुट्टे, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे

*सहकारी संस्था मतदारसंघ* - सत्यभामा उत्तमराव आघाव 

*अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी* - मंचक घोबाळे

*महिला प्रतिनिधी* - पंकजाताई मुंडे, ॲड. यशःश्रीताई मुंडे

*इतर मागासवर्गीय प्रतिनिधी* - केशव माळी, *भटक्या विमुक्त जाती जमाती* प्रतिनिधी - वाल्मिक कराड

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या