इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 श्री माधवाश्रम विद्यामंदिर, खडका कॅम्पचे घवघवीत यश:शाळेचा निकाल 92%


सोनपेठ (प्रतिनिधी) दिनांक: 02 जुन 2023, संगमेश्वर शिक्षण संस्था, परळी संचलित श्री माधवाश्रम विद्यामंदिर, खडका कॅम्प, ता. सोनपेठ जि. परभणी या विद्यालयाने आपली यशाची उज्जवल परंपरा यंदाही कायम राखली शाळेचा निकाल पुन्हा 92.6% लागलेला आहे. विद्यार्थींनी कु. कराळे शुभ्रता विजयकुमार हिने 88.60% गुण मिळवून विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कु. यादव वैष्णवी माधव  हिने 87.80% गुणासह शाळेतून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे तर कु. कोरडे मैथिली माणिकराव हिने 86.60% गुण घेवून तिसरा क्रमांक मिळवला आहे. फेब्रवारी मार्च 2023 मध्ये संपन्न झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयातून 63 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 06 विद्यार्थी विशेष प्राविण्या घेऊन उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणती 22, द्वितीय श्रेणीत 21 तृतीय श्रेणीत 9 विद्यार्थीं उत्तीर्ण झ्ज्ञाले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे , संगमेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. विष्णुदास रामदासराव मुंडे,  सचिव – सौ. रुमा विष्णुदास मुंडे, व मुख्याध्यापक बुंराडे आर.एम. व शिक्षक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या