पोस्ट्स

ऑक्टोबर ४, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रुग्णवाहिकांच्या मार्गातील अडथळा दूर करण्याच्याही दिल्या सूचना*

इमेज
बीड शहरातील रस्त्याचे काम संथ गतीने ; ना. पंकजा मुंडेंनी घेतला समाचार काम जलदगतीने पूर्ण करण्याचे नॅशनल हायवे च्या अधिकाऱ्यांना निर्देश बीड दि. ०४ --- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या अडीच किलोमीटरच्या सिमेंट रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने होत असल्याच्या कारणावरून राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज नॅशनल हाय वे च्या अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. हे काम जलदगतीने पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रुग्णवाहिकांच्या मार्गातील अडथळा दूर करण्याच्याही सूचनाही त्यांनी दिल्या     शहरातील महत्वाकांक्षी सिमेट रस्त्याच्या कामा संदर्भात स्थानिक वर्तमानपत्रात आलेल्या बातमीची दखल घेत ना. पंकजाताई मुंडे यांनी नॅशनल हाय वे कार्यकारी अभियंता उबाळे यांना संपर्क साधून याविषयी जाब विचारला. कोणत्याही परिस्थितीत हे काम जलदगतीने झाले पाहिजे असं त्यांनी निःक्षून सांगितलं. रूग्णवाहिकेचा अडथळा दूर करा -------- छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या बार्शी रोडवरील राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे आणि नालीचे काम ...

उद्या वडवणी, धारूर, माजलगांव, गेवराईत पाहणी...

इमेज
  ना.पंकजा मुंडे यांनी दुष्काळ पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना दिला धीर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा    उद्या वडवणी, धारूर, माजलगांव, गेवराईत पाहणी करणार बीड दि. ०४ --- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज बीड व पाटोदा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. खचून जाऊ नका, सरकार खंबीरपणे आपल्या पाठिशी उभा आहे अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.      बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. मागील आठवड्यात परळी, अंबाजोगाई, केज तालुक्याचा दौरा केल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी आज बीड तालुक्यातील काकडहिरा, मूर्शदपूर, वंजारवाडी व पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी, रोहतवाडी, थेरला, जवळाला, तांबा राजूरी आदी ठिकाणी  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.  भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, विजय गोल्हार, योगेश क्षीरसागर, सर्जेराव तांदळे, सलीम जहांगीर, अशोक लोढा, अनुरथ सानप, मधुकर गर्जे, सुधीर घुमरे, सुवर्णा लांबरूड आदी यावेळी उपस्थित होते. ...

बीड, गेवराई, आष्टी,पाटोदा, शिरूर कासार तालुक्यातील जनतेची गर्दी

इमेज
बीडचे जनसंपर्क कार्यालय प्रत्यक्ष जनसेवेत रूजू ; ना. पंकजा मुंडेंचा पहिलाच 'जनता दरबार' हाऊसफुल्ल नागरिकांशी 'फेस टू फेस' संवाद  लोकांच्या समस्यांचा जागेवर निपटारा  बीड, गेवराई, आष्टी,पाटोदा, शिरूर कासार तालुक्यातील जनतेची गर्दी बीड दि. ०४ -- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी शहरात नव्यानेच सुरू केलेले जनसंपर्क कार्यालय आज प्रत्यक्ष जनसेवेत रूजू झाले आहे. ना. पंकजाताईंनी घेतलेला पहिलाच 'जनता दरबार' हाऊसफुल्ल झाला. प्रत्येकांची समोरासमोर भेट आणि समस्यांचा जागेवरच निपटारा झाल्याने नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले. बीडसह गेवराई, आष्टी,पाटोदा, शिरूर कासार, वडवणी आदी तालुक्यातील जनतेची गर्दी यावेळी पहायला मिळाली.     शहरातील तहसील कार्यालयासमोरील साधना अव्हेन्यू व्यापारी संकुलात हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून मागील आठवड्यात याचे लोकार्पण झाले होते. ना. पंकजाताई मुंडे आज दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या, तत्पूर्वी त्यांनी दुपारी जनसंपर्क कार्यालयात येऊन  सुमारे चार तास जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या, त्यांची ग...

अभिष्टचिंतन विशेष लेख...

इमेज
वारसा सेवेचा , तळमळ विकासाची, जोड संवेदनशीलतेची  : परळीकरांच्या विश्वासाला मिळाले 'पद्मश्री'  नेतृत्व !     ज्यो तिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या पावन नगरीच्या विकासाच्या वाटचालीत लोकप्रतिनिधित्वाची भूमिका ही केवळ पदापुरती मर्यादित नसते. नागरिकांच्या अपेक्षा समजून घेणे, शहराच्या प्रश्नांची नाडी ओळखणे आणि उपलब्ध साधनसामग्रीतून विकासाला दिशा देणे, हे त्यामागचे खरे आव्हान असते. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा आत्तापर्यंतचा सार्वजनिक जीवनातील प्रवास पाहता, सामाजिक बांधिलकी आणि शहराच्या विकासाचा ध्यास या दोन बाबी ठळकपणे समोर येतात.सेवेचा वारसा ,  विकासाची तळमळ, अभ्यासू संवेदनशील नेतृत्व त्यांच्या माध्यमातून परळीला मिळाले आहे. परळीकरांच्या विश्वासाला खऱ्या अर्थाने 'पद्मश्री' मिळाली असल्याचा सकारात्मक आशावाद निर्माण झाला आहे. तमाम परळीकरांचे अतिशय जबाबदारीने, विकासाची नवी दृष्टि आणि नवी दिशा घेऊन प्रथम नागरीक म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा आज (४ऑक्टोबर) वाढदिवस. त्यानिमित्त त...
इमेज
अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार — तहसीलदार बोरना प्रकल्पातील अनधिकृत पाणी उपशावर कारवाई परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-            परळी तालुक्यातील नंदनज, कासारवाडी, मिरवट, सारडगाव, मांडवा आणि मरळवाडी परिसरासाठी महत्त्वाच्या असलेल्या बोरना मध्यम प्रकल्पात सध्या १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. या प्रकल्पातूनही अनधिकृतपणे पाणी उपसा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत पाणी उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारी व पंपांवर कारवाई करून पाणीसाठ्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.      बोरणा प्रकल्पातून सुरू असलेल्या अनधिकृत पाणी उपशावर अखेर तहसील प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकाने प्रकल्प परिसरात कारवाई करत अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारी बंद केल्या. संबंधित डीपी बंद करून खाली काढण्यात आल्याने अनधिकृत पाणी उपशाला आळा बसला आहे. बोरना हे प्रकल्प तालुक्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे जलस्रोत असल्याने उपलब...
इमेज
  छत्तीसगड महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा डॉ. ममता साहू यांचा तेली समाजाच्या वतीने सत्कार परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)     छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा तथा कॅबिनेट मंत्री दर्जा असलेल्या डॉ. ममता साहू यांनी परळी वैजनाथ येथे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यानंतर तेली समाजाच्या वतीने त्यांना श्री शनी मंदिर येथे निमंत्रित करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महामंडलेश्वरी यामिनी देवीजी यांचाही तेली समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.       डॉ. ममता साहू या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी येथे आल्या असता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. समाजाच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्यात त्यांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच महामंडलेश्वरी यामिनी देवीजी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, श्री शनी मंदिर देवस्थानचे व्यवस्थापक चंद्रकांत उदगीरकर, नांदेड विभागाध्यक्ष प्रा. प्रविण फुटके, तालुकाध्यक्ष मनोज जठार,...