भावपूर्ण श्रद्धांजली........!!!!
शिवाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी स्वप्नील पतंगे तर सचिव गुलाब पीलवटे यांची निवड
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आगामी १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यासाठी शिवाजी नगर येथे नुकतीच विशेष बैठक पार पडली. या बैठकीत चालू वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारणी महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसंमतीने जाहीर करण्यात आली.या निवडीमध्ये अध्यक्षपदी स्वप्नील पतंगे यांची, तर सचिवपदी गुलाब पिलवटे यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे; सोहेल फिरोज पठाण, रजनीकांत गायकवाड, लखन मोरे, गणेश साळुंके, चंद्रकांत पठाडे.मार्गदर्शक महादेव गंगणे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "यंदाची जयंती केवळ औपचारिकतेसाठी नसून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणण्यासाठी असेल."
या निवडीबद्दल परिसरातील नागरिकांनी आणि विविध संघटनांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. लवकरच जयंती उत्सवाचे सविस्तर नियोजन करण्यासाठी कार्यकारणीची पहिली बैठक बोलावण्यात येणार असल्याचे महादेव गंगणे पाटील यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा