अनंत इंगळे यांचा स्तुत्य उपक्रम

 स्मृतिशेष नागोराव इंगळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंनिस पत्रिकेच्या वार्षिक वर्गणीचे वाटप; अनंत इंगळे यांचा स्तुत्य उपक्रम




परळी / प्रतिनिधी 

परळी येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या परळी शाखेला राज्याध्यक्ष माधव बावगे व राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी भेट दिली यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सचिव अनंत इंगळे यांनी आपले वडील स्मृतिशेष नागोराव इंगळे यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन केले. वडिलांच्या आठवणी जपत, समाज प्रबोधनाला गती देण्यासाठी त्यांनी 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिके'च्या १५ वाचकांची  वार्षिक वर्गणी भरून १५ कार्यकर्त्यांना ही पत्रिका भेट दिली.

दरवर्षी कौटुंबिक किंवा धार्मिक विधींवर खर्च करण्यापेक्षा, विवेकी विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशाने अनंत इंगळे यांनी हा निर्णय घेतला. 'अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका' हे विवेकवादी विचारांचे मुखपत्र असून, त्या माध्यमातून अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींविरुद्ध जनजागृती केली जाते. अनंत इंगळे यांनी १५ कार्यकर्त्यांच्या नावावर या अंकाची वर्षभराची वर्गणी जमा करून सामाजिक कार्यात आपला सक्रिय वाटा उचलला आहे.

या उपक्रमाचे अंनिसच्या परळी शाखेसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे विवेकवादाची चळवळ घराघरात पोहोचण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी परळी शाखेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...