भावपूर्ण श्रद्धांजली........!!!!

इमेज
गोविंद (भैय्या)चांडक यांना आजीशोक; फुलाबाई काकाणी यांचे निधन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      येथील सर्वपरिचित व्यावसायिक गोविंद (भैय्या) चांडक यांच्या आजी श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी यांचे दि.६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.      श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी या अतिशय कुटुंबवत्सल, धार्मिक, संयमी व धीरोदात्त स्वभावाच्या होत्या. वयाची शंभरी पार करत त्यांनी जीवनभरात लेक, नातू, नातसूना पणतू अशा पारिवारिक नात्यांना भरभरून माया दिली. चांडक परिवारासाठी एक आधारवड अशी कौटुंबीक भूमिका त्यांनी अगदी लीलया पार पाडत एक आदर्श निर्माण केला. वयोमानापरत्वे त्यांनी शतकी आयुष्यात इहलोकीची यात्रा संपवली. त्यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथील मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन नातू, तीन नाती,नातसूना, पतवंडे असा मोठा परिवार आहे.श्रीमती फुलाबाई राधाकिशन काकाणी यांच्या निधनाने चांडक कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.

स्वा रा ती च्या वैद्यकीय विद्यार्थ्याने गळफास घेतल्याने अंबाजोगाईत खळबळ






अंबाजोगाई (प्रतिनिधी):- येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात त्वचा रोग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मंदार उमेश दाभाडे (वय २८) या विद्यार्थ्याने आज पहाटे राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मूळचा पुणे येथील रहिवासी असलेला मंदार हा या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. मंदार हा अंबाजोगाई  शहराच्या चनई रोडवरील संत रविदास नगर भागातील सातपुते यांच्या घरी दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहत होता. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी कालच दि ५ रोजी आपल्या घरमालकाला फोन पे द्वारे तीन हजार रुपये घरभाडे पाठवले होते. त्यानंतर  पहाटे  त्यांच्या भावाला आपल्या मोबाईलचा पासवर्ड संदेशाद्वारे पाठवला होता.  त्यानंतर आपण राहात असलेल्या खोलीतील पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंदारने गळफास घेण्यापूर्वी तोंडावर रुमाल बांधला असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. 

            घटनेची माहिती मिळताच स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांना माहिती मिळताच पोलीस दलही तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन  पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.  त्यासोबतच फॉरेन्सिक लॅबची टीम देखील पुराव्यांच्या संकलनासाठी पाचारण करण्यात आली असून सदर टीम घटनास्थळी पाहणी करत आहे. मंदारसारख्या अत्यंत मनमिळाऊ, होतकरू विद्यार्थ्याने ऐन उमेदीच्या काळात हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र मंदारच्या या टोकाच्या पावलाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मंदारने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे पोलीस तपासात निष्पन्न होईलच .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!