काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटन सृजन अभियान

 काँग्रेस कमिटीच्या वतीने संघटन सृजन अभियान




काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- मनोज गित्ते

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने देशभरात 'संघटन सृजन अभियान' हाती घेतले असून, बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या परळी वैजनाथ शहरातील बीड रोडवरील चेंबरी रेस्ट हाऊस येथे 'संघटन सृजन अभियान' संदर्भात बैठक होणार आहे.तरी परळी वैजनाथ तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन धर्मापुरी गटातील युवक काँग्रेसच्या युवानेते मनोज गित्ते यांनी केले आहे.

        अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये संघटन सुजन अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ  आणि राज्याचे काँग्रेसच्या नेत्या खा. रजनीताई अशोकराव पाटील ,अशोकराव पाटील , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कमिटी सरचिटणीस व  नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड विधानसभा प्रभारी  आदित्य दादा पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या  आणि मार्गदर्शनाखाली संघटन सुजन अभियानच्या बीड जिल्हा प्रमुख श्रीमती नितू वर्मा जी निरीक्षक अ.भा. काँग्रेस कमिटी नवी दिल्ली यांच्या यांच्या सह मा.एम.एम.शेख (माजी आमदार)  सुरेंद्र गोडजकर (संघटन निरीक्षक) श्रीमती विद्याताई पाटील (प्रदेश समन्वयक) व तसेच परळी वैजनाथ काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ॲड.प्रकाश मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली आहे.  परळी वैजनाथ तालुक्यातील काँग्रेस सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  मनोज गित्ते यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...