परळीत आनंदोत्सव.

परळी वैजनाथ : एल. आय .सी .(एस .ओ). शाखेचे सर्व उदिष्ट पूर्ण; यशाचा जोरदार आनंदोत्सव  




परळी : एल आय सी च्या छत्रपती संभाजीनगर विभागातील परळी वैजनाथ (SO) शाखेने  मार्च अखेर विविध विमा योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्व स्तरांवरील निर्धारित उद्दिष्टे पूर्ण केली आहेत.

या यशाचा आनंदोत्सव सोमवार, दिनांक  ६ एप्रिल 2026 रोजी  दुपारी १२ वाजता ढोल-ताशा सह मिरवणूक काढून  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आंबेजोगाई शाखेचे वरिष्ठ शाखा अधिकारी श्री. हनुमानजी मासाळ साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास आंबेजोगाई शाखेचे वरिष्ठ शाखा अधिकारी श्री. हनुमानजी मासाळ, शाखा अधिकारी श्री. प्रमोदजी पाटील,  परळी वैजनाथ शाखेचे शाखा अधिकारी श्री. नरसिंहजी बिरेवाड ,  ओमकेश    दहिफळे व  एल आय सी  (विमा ) प्रतिनिधी उपस्थित होते

टिप्पण्या