निवड.....!!!!

परळी वैजनाथ इनरव्हील क्लबची नुतन कार्यकारिणी जाहीर: अध्यक्षपदी सौ. आशा धुमाळ 

परळी वैजनाथ : प्रतिनिधी....

सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या इनरव्हील क्लब परळीची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी सौ. आशा उत्तम धुमाळ तर सेक्रेटरी म्हणून सौ. शैलजा बाहेती यांची निवड करण्यात आली आहे. 

     परळी वैजनाथ इनरव्हील क्लब मेंबर्सची नुकतीच बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून सौ. आशा धुमाळ, सेक्रेटरी शैलजा बाहेती यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष सौ. उमा समशेट्टी, इडिटर सौ. अनिता धुमाळ, ट्रेझरर सौ. सुरेखा बेंडसुरे, आयएसओ सौ. तारा अग्रवाल तर सीसी सौ. मधुबाला कांकरिया यांची निवड करण्यात आली. यावेळी मावळत्या अध्यक्षा अ‍ॅड. शुभांगी गिते यांच्यासह पदाधिकारी सदस्या उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...