पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कारवाईचा निषेध; निष्पक्ष चौकशीची मागणी
संपादक बाळासाहेब कडबाने यांच्यावरील कथित खोटा गुन्हा मागे घ्या; सिरसाळा पत्रकार संघाची पोलीस प्रशासनाकडे मागणी
पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कारवाईचा निषेध; निष्पक्ष चौकशीची मागणी
परळी वैजनाथ / सिरसाळा, दि. ५ जुलै :
'दैनिक जगमित्र'चे संपादक बाळासाहेब कडबाने यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला कथित खोटा गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी सिरसाळा पत्रकार संघाने पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा, अशीही भूमिका संघटनेने मांडली आहे.
पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांना अशा प्रकारे लक्ष्य करणे हे लोकशाही आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी घातक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि बाळासाहेब कडबाणे यांच्यावरील कथित खोटा गुन्हा मागे घ्यावा, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सिरसाळा पत्रकार संघाच्या या भूमिकेमुळे पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पत्रकारितेच्या स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी एकजुटीने उभे राहण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
पत्रकार संघाच्या प्रमुख मागण्या :
बाळासाहेब कडबाणे यांच्यावरील कथित खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा.
संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी.
पत्रकारांवर अन्यायकारक कारवाई होऊ नये.
पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करावे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा