लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या सार्वजनिक जयंती उत्सव समिती, साठे नगरच्या अध्यक्षपदी सुनिल मस्के
परळी वैजनाथ, प्रतिनिधी : श्रमिक, कष्टकरी आणि वंचित समाजाचा बुलंद आवाज असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या सार्वजनिक जयंती उत्सवानिमित्त साठे नगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात बैठक पार पडली. बैठकीत यंदाचा सार्वजनिक जयंती उत्सव सामाजिक सलोखा, प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी बबन मस्के हे होते. विजयकुमार शिंदे व गंगाधर मस्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी जयंती उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.
*समितीच्या अध्यक्षपदी सुनिल मस्के, उपाध्यक्षपदी निवास मस्के, सचिवपदी गुलाब शिरसागर, कोषाध्यक्षपदी संतोष मस्के तसेच सहसचिवपदी महादेव मस्के आणि नागेश मस्के यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*
नवनियुक्त अध्यक्ष सुनिल मस्के यांनी बोलताना सांगितले की, "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदाची १०६ वी सार्वजनिक जयंती आदर्श पद्धतीने साजरी करण्यात येईल. जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग घेतला जाईल."
बैठकीत भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजातील उल्लेखनीय व्यक्तींचा गौरव आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
बैठकीस मुन्ना मस्के,विढल लोंढे , गणेश मस्के, विनायक मस्के ,योगीराज चौरे ,अंगद मस्के,सोमेश शिरसागर , दिनेश मस्के , वैजनाथ मस्के ,आभिषेक मस्के ,दैवलत साळवे, गोटया साळवे ,बंटी मस्के ,सैरभ मस्के , बापु मस्के,धनु वाघमारे ,छत्रुधन घोडके,राज शिरसागर,अनिकेत मुजमुले, यशवंत चौरे, कृष्णा कांबळे, संकेत मुजमुले,लखन मस्के,साठे नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा