मुरूम, डस्ट टाकून रस्ता तातडीने चिखलमुक्त करण्याची मागणी

पावसामुळे अंबेवेस पुलाचा पर्यायी रस्ता चिखलमय; वैद्यनाथ दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय !

मुरूम, डस्ट टाकून रस्ता तातडीने चिखलमुक्त करण्याची मागणी

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

      आंबेवेस परिसरातील सरस्वती नदीवरील पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता पावसामुळे चिखलमय झाला असून, प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या रस्त्यावर तातडीने मुरूम व डस्ट टाकून तो चिखलमुक्त करावा, अशी मागणी नागरिक आणि भाविकांकडून होत आहे.

       या पर्यायी रस्त्याची दुरवस्था गुरुवारी समोर आली. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा चिखलामुळे तोल जाऊन पडल्याची घटना घडली. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नसली तरी या घटनेमुळे रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या पावसाळा सुरू असून, आगामी श्रावण महिन्यात प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविक गावभागातून याच मार्गाचा वापर करतात. तसेच गुलाब महाराज पालखीसह विविध पालख्या याच मार्गाने जात असल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

   आंबेवेस सरस्वती नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. मात्र सध्या भरावाचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधित कंत्राटदार आणि नगर परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार अवगत करण्यात आले आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर मुरूम व डस्ट टाकण्यात आलेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.


"पर्यायी रस्ता तातडीने चिखलमुक्त करणे आवश्यक आहे. संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले आहे. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत निदान पर्यायी रस्ता सुरक्षित व वाहतुकीयोग्य ठेवावा, जेणेकरून नागरिक व भाविकांची गैरसोय होणार नाही."

— नितीन बागवाले, 

 नगरसेवक, परळी वैजनाथ 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!