गौरवास्पद: सर्व स्तरांतून अभिनंदन!!!!
वारकरी संप्रदाय ग्रंथ प्रकाशन समितीवर राष्ट्रीयअध्यक्ष म्हणून ॲड. दत्तात्रय आंधळे यांची निवड
नाशिक (प्रतिनिधी )संतवाङ्मयाचे संशोधक तथा ह.भ.प.ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांची निवड वारकरी संप्रदाय राष्ट्रीय अध्यक्ष ग्रंथ प्रकाशन समितीवर वारकरी संप्रदाय संघटना राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.श्री अण्णासाहेब आहेर महाराज हिसवळकर यांनी केली.
श्री दत्तात्रय महाराज आंधळे हे महाराष्ट्रभर वारकरी पध्दतीने कीर्तनाचे माध्यमातून प्रचार व प्रसार भागवत कथाकार,श्रीदत्त कथा प्रवक्ते आहेत.
प्रकाशित पुस्तके
*ज्ञानदेवांची गुरुगीता
*ज्ञानेश्वरी अनुभवावी ही कथा
*श्री संत जगमित्र नागा चरित्र
*आद्यकवी श्रीमुकुंदराज एक शोध -वाट
*जाणिवेच्या कळा
* सार्थ विवेकसिंधु या मराठीतील आद्यकवी मुकुंदराज रचित ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
* नुकतेच मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमीने व आषाढी कार्तिकी वारी महामंडळ आयोजित समरसते चे संत या कार्यक्रमात दत्तात्रय आंधळे यांचे "अत्यंत दुर्मिळ संत जगमित्रनागा अभंग गाथा"चे प्रकाशन इंदौर येथे प्रकाशन झाले.
संत जगमित्रनागा चरित्र पुणे विद्यापीठात संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून ठेवण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे मराठी भाषा विकिपीडियावर त्यांची दोन पुस्तके अगदी सुरुवातीला मराठी साहित्य आद्य संत कवी या सदरामध्ये मुकुंदराज आणि श्री संत जगमित्र नागा या दोघा वर त्यांची नोंद आहे.
अनेक पुरस्कार प्राप्त
झाडीबोली साहित्य संमेलनाचा आद्यकवी मुकुंदराज पुरस्कार घटनेत दुरुस्ती करून लेखकाला देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले सन2020
संतवाड्.मयाचे संशोधन आणि लिखाण कार्याबद्दल सन २०२१चा संतजगमैत्र पुरस्कार पिरंगुट पुणे प्राप्त.
. १६एप्रिल २०२२ कै.सिताराम आपेट स्मरणार्थ ११,०००/-रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
साहित्य रत्न पुरस्कार माहात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे येथे भाऊ बाबा वंजारी संघाच्या वतीने २०२२चा प्रदान
सन २०२३ ग्रामीण मराठी साहित्य संमेलन नाथ्रा येथील संमेलनात साहित्य भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संतजगमित्रनागांची जन्मभूमी पिरंगुट पुणे येथे ग्रामस्थांनी स्मृती स्तंभ उभारला असून तेथे एक शिलालेख लिहिलेला आहे.त्यावर ,"संत जगमित्र नागा चरित्र लेखक-ॲड दत्तात्रय आंधळे यात जगमित्राचे
अभंग आणि काही पद आढळतात.सदर संत जगमित्रनागा चरित्र हे पुणे विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून ठेवण्यात आले आहे."असा मजकूर कोरला गेला आहे.पुंडलिक महाराज थेटे गिरणारे राष्ट्रीय सचिव वारकरी संप्रदाय संघटना यांनी नियुक्ती केली आहे.लवकरच वारकरी संतसाहित्य संमेलन दत्तात्रय महाराज आंधळे यांच्या संमेलनाध्यक्षतेखाली भरविण्यात येईल.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष जीवन महाराज आहिरे पाटणेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष पांडुरंग महाराज गडकरी शिवनई राष्ट्रीय उपाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे गणेशगांवकर,संजय महाराज गोडसे आडगांव शहराध्यक्ष वारकरी संप्रदाय नाशिक यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा