धडक देणारी पिकअपही झाली पलटी, कन्हेरवाडी घाटातील घटना
भरधाव वाहनाची मोटार सायकलला धडक, दोघांचा मृत्यू, एक गंभीर
धडक देणारी पिकअपही झाली पलटी, कन्हेरवाडी घाटातील घटना
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भरधाव बोलेरो पिकअप गाडीने मोटार सायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज मंगळवारी रात्री 8.30 वाजण्याचे सुमारास कण्हेरवाडी घाटात घडली. घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी रात्री 8.30 वाजण्याचे सुमारास शहरातील सावतामाळी नगर भागात राहणारे गणेश मुरुळे, गणेश खोले व मुंजा मिसाळ हे तीन युवक मोटार सायकल क्र. एम. एच. ४४ एए ३०६४ यावरून कामानिमित्त अंबाजोगाईकडे जात असताना कन्हेरवाडी घाटात हॉटेल नंदनवन जवळ त्यांच्या गाडीला एका बोलेरो पिकअप गाडीने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गणेश मुरुळे, मुंजा मिसाळ व गणेश खोले हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी गणेश मुरुळे, मुंजा मिसाळ यांना मृत घोषित केले. गणेश खोले हा गंभीर जखमी त्याला तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा