प.पू. वामनानंद महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन




परळी वैजनाथ | प्रतिनिधी 

    श्री चिन्मयानंद संस्थान, उमरखेड पूर्व मठाधिपती ब्रह्मलीन परमपूज्य श्री वामनानंद महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून सर्व शिष्यवृंद, भाविक व भक्तांनी उपस्थित राहून  लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

      कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत प्रतिमेचा व पादुकांचा अभिषेकाने होईल. त्यानंतर सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत श्री विश्वंभर घोंडोपंत पाठक सिरसाळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत 'परमहंस तुकामाई चरित्र आणि विश्वगुरू भारत' या विषयावर प्रवचन होणार आहे. सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत पंचपदी व आरतीचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर दुपारी १२.०० वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बडवे सभागृह, देशपांडे गल्ली, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यतिथी सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...