महिला महाविद्यालयात स्वामी विवेकानंद पुण्यतिथी साजरी
परळी वैजनाथ,प्रतिनिधी
येथील कै .लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आज दि . ४. ७ . २६ रोजी स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी राष्ट्रीय सेवा योजना विभागद्वारा साजरी करण्यात आली .
आरंभी संस्थेचे अध्यक्ष मा संजय देशमुख , कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे आदी मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी रासेयो विभागाचे डॉ . पी .व्ही गुट्टे सरानी स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला .
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका सौ छायाताई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्यासह प्रा डॉ . अरुण चव्हाण डॉ राजश्री कल्याणकर . डॉ विलास देशपांडे डॉ राजकुमार यल्लावाड डॉ . रंजना शहाणे डॉ . विद्या गुळभिले डॉ. वाघमारे सर डॉ जोशी सर, प्रा डॉ संगिता कचरे आदि मान्यवरांची उपस्थिती होती .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा