गौरवास्पद......सर्व स्तरातून अभिनंदन!!!!

 परळीचे कवी दिवाकर जोशी यांची गझल विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

परळी वैजनाथ : एमबी न्यूज वृत्तसेवा...

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाच्या यावर्षीपासून लागू होणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये सुप्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी यांच्या ' सलतो उरात काटा' या गझल संग्रहातील 'विठ्ठल मला निरंतर' या लोकप्रिय गझलेची निवड झालेली आहे 

       या विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या जवळपास ४५० महाविद्यालयाच्या बी.ए.(मराठी) तृतीय वर्षासाठी 'मराठी गझल' असा ५० गुणांचा स्वतंत्र अभ्यासक्रम निर्धारित केला असून त्यामध्ये गझलेच्या सर्वांगीण अभ्यासाबरोबरच महाराष्ट्रातील काही निवडक गझलकारांच्या गझलांचा अंतर्भाव केला आहे. ही मराठी गझलेच्या दृष्टीने अत्यंत उल्लेखनीय आणि सन्मानाची बाब आहे.

      परळी येथील दिवाकर जोशी हे एक नामांकित गझलकार असून ते यापुर्वीही साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. देशपातळीवरील विविध साहित्य संमेलने आणि कविसंमेलनांसाठी ते निमंत्रित असतात. त्यांची हीच गझल महाराष्ट्र शासनाच्या काव्य सादरीकरण स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने सन्मानित झालेली असून महाराष्ट्रातील बऱ्याच शाळांमध्ये दर्शनी फलकावर विराजमान झालेली आहे.

एका प्राथमिक शिक्षकाची कार्यनिष्ठा व‌‌‌ अक्षरभक्तीचा महिमा विशद करणारी ही गझल आता पदवी स्तरावरील विद्यार्थी अभ्यासणार आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय बहुमानाबद्दल परळी व परिसरातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!