पैलवान सुमित भारस्कर एशियन चॅम्पियन : बीडच्या मल्लांने गाजवले थायलंडचे मैदान 


माजलगाव्र तिनिधी)

युनायटेड वर्ल्ड रेसलिंग यांच्या वतीने पटाया थायलंड येथे ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा सुरू आहे. भारतीय कुस्ती संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत असलेला महाराष्ट्रातील पैलवान सुमित आप्पासाहेब भारस्कर याने 70 किलो वजन गटामध्ये (फ्रिस्टाईल) सुवर्णपदक प्राप्त केले आहे. 

     सुमित, रुस्तम ए हिंद व महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती अकादमी मारुंजी जिल्हा पुणे येथे ६ वर्षांपासून सराव करत आहे. पटाया थायलंड येथील सुरू असलेल्या स्पर्धेत सुमित 70 किलो वजन गटामध्ये भारतीय कुस्ती संघात निवड होऊन देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. सुमितची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 'मिशन लक्ष्यवेध' (Mission Lakshyavedh) अंतर्गत हाय परफॉर्मन्स सेंटर्स (High Performance Centres) सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, आहार आणि आधुनिक क्रीडा सुविधा पुरवल्या जातात. या योजनेमध्ये सुमित भारस्कर ची महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने निवड झालेली असुन, तो राज्य शासनाच्या वतीने सध्या बालेवाडी पुणे येथे प्रशिक्षण शिबिरात दाखल आहे. या स्पर्धेत त्याने प्रथम फेरीत किरगीझस्थान देशाच्या पैलवान विरुद्ध ९-७ अशा गुणफरकाने विजय मिळवला, दुसऱ्या फेरीमध्ये तुर्कस्तान देशाच्या मल्लाविरुद्ध ११-० असा एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. 

    अंतिम फेरीमध्ये कझाकीस्थान देशाच्या मल्लाविरुद्ध ची कुस्ती चुरशीची व अटीतटीची झाली. यामध्ये १३-७ अशा गुण फरकाने विजय मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, देशासाठी सुवर्णपदक प्राप्त करून तिरंगा अभिमानाने फडकवला. आशियाई सुवर्णपदक मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी त्याने गुरुवर्य पै.अमोल बुचडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वी केली. याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती क्षेत्रातून पैलवान वस्ताद कुस्तीप्रेमी तसेच अमोल बुचडे कुस्ती अकादमीचे प्रशिक्षक नरेंद्र कुमार, समीर देसाई, उत्कर्ष काळे, विनोद गोरे, कांबळे सर, अनिराज सर, कपिल बुचडे,किसन बुचडे, प्रा महेश घुले, मिलिंद झोडगे, वडील आप्पासाहेब भारस्कर, कल्याण भारस्कर यांनी अभिनंदन केले आहे. 


  हा कौशल्यवान खेळाडू, बीडच्या कुस्तीची वैभवशाली परंपरा आपल्या खांद्यावर घेऊन, जिल्हा व महाराष्ट्रवासी यांचे ऑलिंपिक पदकाचे स्वप्न एक दिवस नक्कीच साकार करेल.

    -पैलवान अमोल बुचडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...