प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही

 शिक्षक बदली प्रकरण ; दुसर्‍या दिवशीही हिवरा (गो.) ग्रामस्थांनी शाळा केली बंद 

नियुक्त रद्द करावी अथवा रिक्त जागा भरण्याची मागणी 

सिरसाळा  : परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती बदली केली असल्याने संतप्त ग्रामस्थ व शालेय व्यावस्थापन समितीने एकत्र येत शाळेला टाळे ठोकले आहे. दिनांक ४ जुलै रोजी हिवरा ग्रामस्थांनी अंदोलन करत  शाळेला कुलूप ठोकले होते व काल दिनांक ६ जुलै देखील संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एकत्र येत अंदोलन करत शाळा बंद केली . शिक्षक बदली प्रकरणी संबंधित प्रशासन लक्ष देत नाही. या मुळे हिवरा ग्रामस्थ अधिकच आक्रमक होत आहेत. भानुदास संभाजी गुडदे असे प्रतिनियुक्ती झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. लाडझरी केंद्र अंतर्गत असलेल्या दौंडवाडी येथे त्यांची नियुक्त केली आहे. सदरील नियुक्ती माजी आमदार संजय दौंड यांच्या सूचनेवरुन तसेच शालेय व्यावस्थापन समिती दौंडवाडी यांच्या निवेदन मागणी वरुन संबंधित शिक्षकाची प्रतिनियुक्ती केली असल्याचे गट शिक्षण अधिकारी कार्यालय पंचायत समिती परळी वैजनाथ पत्रात म्हटले आहे. बदली रद्द करावी किंवा रिक्त पद तात्काळ भरावे या मागणी वरुन हिवरा ग्रामस्थ आक्रमक झाले. दिनांक २ जुलै रोजी बदलीचे पत्र गट शिक्षण अधिकारी कार्यालय परळी यांनी काढले , हि बाब हिवरा ग्रामस्थांना समजताच दिनांक ४ जुलै रोजी शाळेत उपस्थित शिक्षक, विद्यार्थी यांना बाहेर काढत शाळेच्या गेटला टाळे ठोकले. शिक्षक भानुदास गुडदे अंत्यत हुशार,शिस्तप्रिय व विद्यार्थी घडवणारे शिक्षक असुन आम्हाला हेच शिक्षक या ठिकाणी हवे आहेत अशी भावना व्यक्त करत संतप्त हिवरा ग्रामस्थांनी गेटला टाळे ठोकत अंदोलन केले आहे.  काल अंदोलनाचा दुसरा दिवस होता ,आपली मागणी घेऊन ग्रामस्थांनी शाळे पुढे अंदोलन केले परंतु गट शिक्षण अधिकारी कार्यालय परळी व बीड शिक्षण विभाग यांनी दखल घेतली नाही. जो पर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत अंदोलन सुरुच राहिल असा ठाम पवित्रा हिवरा ग्रामस्थांनी घेतला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...