पंकजा मुंडे यांनी दिल्लीहून दूरध्वनीवरून साधला संवाद

 राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे घेतले दर्शन

पंकजा मुंडे यांनी दिल्लीहून दूरध्वनीवरून साधला संवाद

परळी वैजनाथ, प्रतिनिधी :

     राजमाता श्रीमंत कल्पनाराजे भोसले यांनी गोपीनाथ गड येथे भेट देऊन स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी समाधीस्थळी पुष्प अर्पण करून लोकनेते मुंडे यांच्या कार्याला अभिवादन केले.

       राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या स्वागतासाठी स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे त्या प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र, त्यांनी दूरध्वनीवरून राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्याशी संवाद साधून त्यांच्या गोपीनाथ गड भेटीबाबत आनंद व्यक्त केला तसेच शुभेच्छाही दिल्या. या प्रसंगी उपस्थितांनी राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे स्वागत केले.

ना.पंकजाताईंनी साधला फोनवरून संवाद

   ना. पंकजाताई मुंडे हया नवी दिल्लीत असल्याने त्यांनी राजमाता कल्पनाराजे यांच्याशी मोबाईलवर संवाद साधला. मुंडे साहेबांनी उदयनराजेंवर पुत्रवत प्रेम केले होते असा उल्लेख त्यांनी यावेळी बोलताना आवर्जून केला. छत्रपती भोसले घराणे आणि मुंडे परिवाराचे प्रेम हे सद्गदित करणारं आहे, असं ना. पंकजाताईंनी यावेळी म्हटले.यावेळी गोपीनाथ गडावर भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश गीते, वैद्यनाथ बँकेचे उपाध्यक्ष रमेश कराड, लक्ष्मीकांत कराड माणिक कराड, जिल्हा सरचिटणीस गणेश कराड, अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष संतोष भगत, शिवाजी गिते, हिंदूलाल काकडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

•••• 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...