ना.पंकजा मुंडे यांचा उद्या बीड, पाटोद्यात दुष्काळ पाहणी दौरा ; शेतकऱ्यांना देणार दिलासा
बीड दि. ०३ ----
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे बीड जिल्ह्यात येत असून उद्या (ता. ०४) बीड व पाटोदा तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत.
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी दुष्काळाची भयानकता लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार व दिलासा देणे आवश्यक आहे. ना. पंकजाताई मुंडे यासाठी जिल्ह्यात येत असून उद्या दुपारी ३ ते ६.३० वा. दरम्यान त्या दुष्काळ व पीक परिस्थितीची पाहणी करणार आहेत. उद्या बीड तालुक्यातील काकडहिरा, मूर्शदपूर, वंजारवाडी तर
पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी, रोहतवाडी, थेरला, जवळाला, तांबा राजूरी येथे पाहणी दौरा करणार आहेत, परवा म्हणजे ५ तारखेला त्या वडवणी, धारूर, माजलगांव आणि गेवराई तालुक्यात पाहणी करणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाने दिली आहे.
••••

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा