छत्तीसगड महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा डॉ. ममता साहू यांचा तेली समाजाच्या वतीने सत्कार

परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)

    छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा तथा कॅबिनेट मंत्री दर्जा असलेल्या डॉ. ममता साहू यांनी परळी वैजनाथ येथे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यानंतर तेली समाजाच्या वतीने त्यांना श्री शनी मंदिर येथे निमंत्रित करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महामंडलेश्वरी यामिनी देवीजी यांचाही तेली समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

      डॉ. ममता साहू या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी येथे आल्या असता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. समाजाच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्यात त्यांचा शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच महामंडलेश्वरी यामिनी देवीजी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, श्री शनी मंदिर देवस्थानचे व्यवस्थापक चंद्रकांत उदगीरकर, नांदेड विभागाध्यक्ष प्रा. प्रविण फुटके, तालुकाध्यक्ष मनोज जठार, शनैश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवशंकर जठार, शिवम सुपर शॉपीचे संचालक वैजनाथ कोल्हे, नवगण महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख नरेश साखरे, चंद्रशेखर फुटके, शिवराज सोनटक्के, अनिल बेंडे, सोमनाथ वाघमारे, दीपक साखरे, प्रसाद जठार यांच्यासह तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभू वैद्यनाथाच्या पावन नगरीत छत्तीसगड राज्य महिला आयोगाच्या राज्याध्यक्षा डॉ. ममता साहू यांचा तेली समाजाच्या वतीने करण्यात आलेला हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!