बीड, गेवराई, आष्टी,पाटोदा, शिरूर कासार तालुक्यातील जनतेची गर्दी
बीडचे जनसंपर्क कार्यालय प्रत्यक्ष जनसेवेत रूजू ; ना. पंकजा मुंडेंचा पहिलाच 'जनता दरबार' हाऊसफुल्ल
बीड, गेवराई, आष्टी,पाटोदा, शिरूर कासार तालुक्यातील जनतेची गर्दी
बीड दि. ०४ -- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी शहरात नव्यानेच सुरू केलेले जनसंपर्क कार्यालय आज प्रत्यक्ष जनसेवेत रूजू झाले आहे. ना. पंकजाताईंनी घेतलेला पहिलाच 'जनता दरबार' हाऊसफुल्ल झाला. प्रत्येकांची समोरासमोर भेट आणि समस्यांचा जागेवरच निपटारा झाल्याने नागरिकांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले. बीडसह गेवराई, आष्टी,पाटोदा, शिरूर कासार, वडवणी आदी तालुक्यातील जनतेची गर्दी यावेळी पहायला मिळाली.
शहरातील तहसील कार्यालयासमोरील साधना अव्हेन्यू व्यापारी संकुलात हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून मागील आठवड्यात याचे लोकार्पण झाले होते. ना. पंकजाताई मुंडे आज दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या, तत्पूर्वी त्यांनी दुपारी जनसंपर्क कार्यालयात येऊन सुमारे चार तास जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या, त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली आणि समस्यांचे जागेवरच निराकरण केले. सर्व सामान्य माणसापासून ते राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यां पर्यंत सर्वांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले.
या जनता दरबारात सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. रस्ते, पाणीपुरवठा, वीज वितरण, महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे आणि वैयक्तिक लाभाच्या योजना अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केवळ अर्ज स्वीकारले नाहीत, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लगेच फोन करून जागेवर प्रश्नांचा निपटारा केला.
*फेस टू फेस संवाद*
------
जनता दरबारात ना. पंकजाताई मुंडे आलेल्या प्रत्येकाची समस्या नीट ऐकून घेत त्यावर लगेच तोडगा काढून फोन करतात, त्यांची ही शैली पाहून आपल्या समस्यांची गाऱ्हाणी घेऊन आलेल्या जनतेच्या चेहर्यावर समाधानाचे भाव उमटत होते. 'ताईंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, फोन केला, आमचं काम झालं,' अशी भावना जनता दरबारात सहभागी नागरिकांनी व्यक्त केली. काही नागरिकांनी सांगितलेले काम झाल्याबद्दल पेढे घेऊन ना. पंकजाताईंचे आभार देखील यावेळी मानले.
••••


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा