नागापूर धरणाची शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने पाहणी

परळी वैजनाथ : नागापूर धरणाची पाहणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. धरणातील पाणीसाठा, परिसरातील परिस्थिती तसेच नागरिक व शेतकऱ्यांशी संबंधित विविध बाबींची यावेळी पाहणी करण्यात आली.

या पाहणीवेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल, विधानसभा प्रमुख जगन्नाथ साळुंखे, नागापूरचे शाखाप्रमुख सचिन गोरे  मोहाचे विभाग प्रमुख नंदकिशोर देशमुख यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी धरण परिसरातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांच्या अडचणी व विविध प्रश्नांची माहिती घेण्यात आली. संबंधित प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची भूमिका यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!